Pakistan Elections: पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी इमरान खान यांच्या PTI पक्षाकडून ओमर अयुब यांच्या नावाची घोषणा

इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने उमर अयूब (Omar Ayub) यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 92 जागा मिळाल्या. त्यामुळे इमरान खान समर्थक खासदारंचा गट हा पाकिस्तानात सत्तास्थापनेचा दावा करणारा सर्वात मोठा गट ठरला आहे.

Omar Ayub Khan | (Photo Credits: X)

इम्रान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (Pakistan Tehreek-e-Insaf) उमर अयूब (Omar Ayub Khan) यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी त्यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या वतीने बंधू शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर अल्पावधीतच पीटीआयने उमर अयूब (Who is Omar Ayub) यांच्या नावाची घोषणा केली. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 92 जागा मिळाल्या. त्यामुळे इमरान खान समर्थक खासदारंचा गट हा पाकिस्तानात सत्तास्थापनेचा दावा करणारा सर्वात मोठा गट ठरला आहे. मात्र, या गटाकडे स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. या सर्वांनी एक पक्ष म्हणून नव्हे तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

 पीटीआयचा महत्त्वाचा निर्णय

नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उमर अयूब यांना पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित करण्याचा निर्णय पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाद्वारे घेण्यात आला आहे. (हेही वाचा, Illegal Marriage In Pakistan: बेकायदा विवाह प्रकरणात Imran Khan आणि Bushra Bibi यांना 7 वर्षांची शिक्षा)

कोण आहेत उमर अयुब?

उमर अयूब हे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल अयुब खान यांच्या कुटुंबातील आहेत. त्यांचा जन्म 26 जानेवारी 1970 रोजी झाला आहे. ते अयुब खान कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. (हेही वाचा, Toshakhana Case मध्ये Imran Khan आणि त्यांची पत्नी Bushra ला 14 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा)

सन 2002 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) मध्ये प्रवेश केल्यानंतर उमर अयूब आणि त्यांचे वडील, गोहर अयुब खान, राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. नॅशनल असेंब्लीचे माजी सदस्य गोहर अयुब खान यांनी विविध मंत्रीपदे भूषवली आहेत. 2002 च्या निवडणुकीत उमर अयूब यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये प्रवेश केला आणि नंतर शौकत अझीझ यांच्या मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून काम केले. (हेही वाचा, Imran Khan Granted Bail: इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, सायफर प्रकरण)

एक्स पोस्ट

हरिपूरमधील नैसर्गिक वायू, वीज आणि रस्ते यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना ओळखले जाते. इमरान खान यांनी स्थापन केलेल्या PTI पक्षात उमर आयूब यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांनी 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत PTI उमेदवार म्हणून NA-17 (हरिपूर) मतदारसंघातून नॅशनल असेंब्लीसाठी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. उमर अयुब यांनी इमरान खानच्या फेडरल कॅबिनेटमध्ये प्रमुख पदे भूषवली. आर्थिक व्यवहार, ऊर्जा आणि पेट्रोलियम मंत्री म्हणून काम केले. पाकिस्तानमधील राजकीय गोंधळाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now