Coronavirus: पैसेच नाहीत! कोरोना व्हायरस विरोधात कसा लढणार पाकिस्तान? जागतिक बँकेला मागितले कर्ज
जागतिक बँकेकडे हात पसरत पाकिस्तानने म्हटले आहे की, सध्यास्थितीत पाकिस्तानकडे असलेले 270 सार्वजनिक रुग्णालयं कोरोना व्हायरसचा निपटारा करण्यासाठी पुरेशी नसल्याचे म्हटले आहे.
भारतासह जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरस विरोधात लढा देत आहेत. भारताचा शेजारी पाकिस्तानही कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात लढतो आहे. मात्र, वाईट बातमी अशी की पाकिस्तान (Pakistan) देशाकडे कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आवश्यक पैसाच नाही. त्यामुळे पाकिस्तानने आर्थिक मदतीसाठी जागतिक बँकेला साकडे घातले आहे. पाकिस्तानने जागतिक बँकेकडे कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी 20 कोटी डॉलर इतके कर्ज द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे जागतिक बँक (World Bank) काय निर्णय घेते यावर पाकिस्तानमधील कोरोना व्हायरस नियंत्रण अवलंबून असणार आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. त्यात कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी पाकिस्तान सक्षम नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने देलेले निर्देशही पाकिस्तानकडून पाळणे मुश्किल झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील देशांना म्हटले आहे की, लवकरात लवकर देशातील नागरिकांची कोरोना व्हायरस चाचणी करण्यात यावी. मात्र, पाकिस्तानला हे शक्य नाही.
दरम्यान, जागतिक बँकेकडे हात पसरत पाकिस्तानने म्हटले आहे की, सध्यास्थितीत पाकिस्तानकडे असलेले 270 सार्वजनिक रुग्णालयं कोरोना व्हायरसचा निपटारा करण्यासाठी पुरेशी नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात 181, पंजाब 26, इस्लामाबाद - 2, बलुचिस्तान येथे 16 तर पख्तून ख्वाह इथे 17 रुग्ण कोरोना बाधित आहेत. पाकच्या अधिकृत कश्मीरमध्येही 5 रुग्ण कोरोना व्हारस बाधित आढळल्याचे समजते. (हेही वाचा, दक्षिण कोरिया: चर्चमधील पवित्र पाणी प्यायल्याने 46 जणांना झाली कोरोनाची लागण)
योजना आयोगाचे उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत कोविड-19 वर नियंत्रण मिळविण्यासाठी क्षमता विकसित करण्यावर चर्चा झाली. या बैठकीनंतर पाकिस्तानला आशा आहे की, त्यांना जागतिक बँकेकडन किमान 14 कोटी डॉलर इतके पैसे मिळू शकतील. वास्तवात पाकिस्तान जागतिक बँकेकडून 20 कोटी डॉलर इतका निधि अपेक्षा करोत आहे.