पाकिस्तान त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी भारताला प्रतिउत्तर देणार- इम्रान खान

त्यावेळी खान यांनी भारताला पाकिस्तान आता प्रतिउत्तर देणार असल्याची भुमिका त्यांनी दर्शवली आहे.

इम्रान खान (फोटो सौजन्य-ट्वीटर)

बालाकोट (Balkot) येथे वायूसेनेने मंगळवारी (26 फेब्रुवारी) केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे. या हल्ल्यात 200 दहशतवादी ठार मारले गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आज पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी (Imran Khan) राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक आज बोलावली होती. त्यावेळी खान यांनी भारताला पाकिस्तान आता प्रतिउत्तर देणार असल्याची भुमिका त्यांनी दर्शवली आहे.

मिराज 200 या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त पाकिस्तानात हल्ले चढवले. त्यात पाकिस्तानातील मुख्य दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या बालकोट येथील तळावर हल्ला करण्यात आला.या हल्ल्यानंतर पाकिस्तान पंतप्रधानांनी तातडीची आज बैठक बोलावली होती. या बैठकीला परराष्ट्र मंत्री,अर्थ मंत्री,संरक्षण मंत्री, सुरक्षा दल आणि पाकिस्तान सैन्य दलाचे प्रमुखांची उपस्थिती दिसून आली.(हेही वाचा-Surgical Strike 2: भारताने आपले नाक कापले, पाकिस्तान संसदेत इम्रान खान यांच्याविरुद्ध घोषणा)

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे उत्तर भारताला आम्ही योग्य वेळी आणि आमच्या पसंतीच्या ठिकाणी देऊ अशी धमकी इम्रान खान यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या जनतेने आणि सैन्याने येणाऱ्या सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे बजावले आहे. त्याचसोबत भारताने केलेला हल्ल्यात जास्त नुकसान न झाल्याचा आव पाकिस्तानकडून केला जात आहे.