Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांना वकील देण्याबाबत पाकिस्तान सरकारची इस्लामाबाद हाय कोर्टात याचिका
पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने कुलभूषण जाधव यांना काऊंसलर अॅक्सेस देण्याबाबत ही याचिका दाखल केली आहे.
पाकिस्तान सरकारकडून इस्लामाबाद हायकोर्टामध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याच्या फाशीबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडीयाच्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या रिपोर्ट्सच्या आधारे आता पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने कुलभूषण जाधव यांना काऊंसलर अॅक्सेस देण्याबाबत ही याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की भारत सरकारच्या मदतीशिवाय जाधव यांना वकील दिला जाऊ शकत नाही तसेच पाकिस्तानचा दावा आहे की जाधव यांनी त्यांच्याशिक्षेविरोधात रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्यासही नकार दिला आहे.
शुक्रवारी कुलभूषण जाधव यांनी तिसरा काऊंसलर अॅक्सेस देण्यात आला होता.तसेच यावेळेस पाकिस्तानचा कोणताही सुरक्षारक्षक मीटिंग दरम्यान नव्हता अशी माहिती देण्यात आली आहे.
ANI Tweet
दरम्यान भारताकडून अशी मागणी केली जात आहे की कुलभुषण जाधव यांना भारताच्या 2 अधिकार्यांना भेटण्याची मुभा असावी. संभाषणाची भाषा इंग्रजी नसावी.तसेच वकील हा पाकिस्तानचा नसावा. तो पाकिस्तानपेक्षा इतर देशातील असावा.
कुलभुषण जाधव 2016 पासून पाकिस्तानमध्ये आहेत. त्यांच्यावर हेरगिरीची आरोप आहे. मात्र भारताने हा दावा नाकारला आहे. 2017 पासून आयसीजे मध्येही हे प्रकरण सुरू आहे. मागील वर्ष आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देखील फाशीच्या शिक्षेवर पुर्विचार करावा असे म्हटले आहे.