Pakistan Flour Crisis: पाकिस्तान पिठाला महाग; गव्हाचा तुटवडा, किमती गगनाला भिडल्या, नागरिकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त
पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे की, तो पिठालाही महाग (Pakistan Flour Crisis) झाला आहे. पाकिस्तानातील खैबर पन्हुनख्वा, सिंध आणि बलूचिस्तान (Balochistan) प्रांतातील अनेक भागांत गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
Pakistan Wheat Shortage: पाकिस्तान भुकेकंगाल झाला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती इतकी खालावली आहे की, तो पिठालाही महाग (Pakistan Flour Crisis) झाला आहे. पाकिस्तानातील खैबर पन्हुनख्वा, सिंध आणि बलूचिस्तान (Balochistan) प्रांतातील अनेक भागांत गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी लोक गहू मिळविण्यासाठी झुंबड करत आहे. काही ठिकाणी तर गव्हासाठी चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे.
वृत्तसंस्था एएनआयने द एक्स्प्रेस ट्रिब्यूनलच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गव्हाचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने पिठाच्या अनुदानित पिशव्या देण्यात येत आहेत. परंतू, त्यासाठी रांगा लावणे आणि त्या पिशव्या मिळवणे या कामात दररोज हजारो लोक अनेक तास वाया घालवत आहेत. (हेही वाचा, Electricity Crisis in Pakistan: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिघडली; वीज खर्च कमी करण्यासाठी बाजार व मॉल रात्री 8.30 वाजता होणार बंद, बल्ब, पंख्यांचे उत्पादन थांबवले)
पाकिस्तानमध्ये सशस्त्र रक्षकांच्या बंदोबस्तात मिनी ट्रक आणि व्हॅनच्या माध्यमातून पीटाच्या थैल्या पाठविण्यात येत आहेत. हा पिशव्या मिळविण्यासाठी लोक वाहनांभोवती जमतात तेव्हा अनेकदा गोंधळाची दृश्ये पाहायला मिळतात. पीठ विक्रेते आणि तंदूर भाजणारे यांच्यात अनेक हाणामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गहू आणि पिठाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
पिठ महागले
कराचीमध्ये पीठ 140 रुपये किलोवरून 160 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये 10 किलोची पिठाची पिशवी 1,500 रुपये किलोने विकली जात आहे, तर 20 किलोची पिठाची पिशवी 2,800 रुपयांना विकली जात आहे. पंजाब प्रांतातील गिरणी मालकांनी पिठाच्या किमतीत 160 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी वाढ केली आहे.
बलुचिस्तानचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झामारक अचकझाई यांनी म्हटले आहे की प्रांतातील गव्हाचा साठा "पूर्णपणे संपला आहे." ते म्हणाले की बलुचिस्तानला ताबडतोब 400,000 पोती गव्हाची गरज आहे. तो जर वेळेत पूर्ण झाला नाही तर अतिशय अराजकी स्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.