Kiss, मिठी, बेड सिन, विवाहबाह्य संबंध, Bold Dressing दाखवणे बंद करा; PEMRA द्वारा पाकिस्तानी मीडियाला आदेश
चित्रपट, नाटक आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये चुंबण , आलिंगन , बेड सिन, विवाहबाह्य संबंध , बोल्ड ड्रेसींग Bold Dressing असलेली दृश्ये दाखवली जातात. ही सर्व दृश्ये संबंधितांना प्रसिद्धी मिळवून देतात परंतू, पाकिस्तानी समाज, संस्कृतीच्या वास्तव प्रतिमेचे दर्शन घडवत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची दृश्ये प्रसारीत करणे थांबवावे, असे पीईएमआरए म्हटले आहे.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी (Pakistan Electronic Media Regulatory Authority) म्हणजेच PEMRA (पीईएमआरए) ने पाकिस्तानी टीव्ही चॅनल आणि नाटकांमधून दाखवल्या जाणाऱ्या काही प्रकारच्या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. पीईएमआरएने एक अधिसूचना काढून म्हटले आहे की, आम्हाला अनेक प्रेक्षकांकडून तक्रारी मिळाल्या आहेत की, अनेक चित्रपट, नाटक आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये चुंबण (Kiss), आलिंगन (Hug), बेड सिन (Bed Scene), विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair), बोल्ड ड्रेसींग Bold Dressing असलेली दृश्ये दाखवली जातात. ही सर्व दृश्ये संबंधितांना प्रसिद्धी मिळवून देतात परंतू, पाकिस्तानी समाज, संस्कृतीच्या वास्तव प्रतिमेचे दर्शन घडवत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची दृश्ये प्रसारीत करणे थांबवावे, असे पीईएमआरए म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय न्याय आयोगाच्या कायेशीर सल्लागार (दक्षिण एशिया) रीमा ओमर यांनी म्हटले आहे की, पीईएमआरए शेवटी काही योग्य मिळाले. विवाहीत जोडप्यांमधील अंतर्गत संबंध दाखवणे हे पाकिस्तानी समाजाचे वास्तव चित्रण नाही. त्यामुळे त्याला मोहक (Glamorize) भासवले जाऊ नये. आमच्या संस्कृतीवर अशा प्रकारची दृश्ये थोपवली जाऊ नयेत. एका रिपोर्टनुसार, पीईएमआरए म्हटले आहे की, एकमेकांच्या गळाभेटी घेणे, आलंगन घेणे, विवाहबाह्य संबंध, अश्लिल वाटावेत बेड सीन, बोल्ड ड्रेसिंग, विवाहीत जोडप्यांमधील अंतर्गत संबंध ही दृश्ये पाकिस्तानी समाजाची इस्लामी शिक्षण आणि संस्कृतीचा पूर्णपणे अपमान करते. या सर्व गोष्टींना मोहीत करुन दाखवले जात आहे. (हेही वाचा, Imran Khan Death Hoax: ट्विटरवर #RipImranKhan हॅशटॅग झाले ट्रेन्ड; इमराम खान यांच्या मृत्युच्या बातमीनंतर सोशल मीडियावर खळबळ, सत्य घ्या जाणून)
पीईएमआरए प्राधिकरणाने पुढे म्हटले आहे की, अश्लील ड्रेसींग, वादग्रस्त आणि आपत्तीजनक प्लॉट, बेड सीन आणि घटनांना अनावश्यक सामग्रीची समीक्षा करण्याचे निर्देश या आधीही अनेकदा देण्यात आले आहेत. रिपोर्टममध्ये म्हटले आहे की, पीईएमआरए कॉल सेंटर द्वारा प्राप्त अधिकाधीक तक्रारी नाटक, मालिका, आक्षेपार्ह दृश्ये दाखवतात. यात 'जुदा हुआ कुछ इस तरह' (Juda Huay Kuch Is Tarha) सारख्या मालिकांचा समावेश आहे. ज्याच्या प्रत्येक भागासाठी आलेल्या टीजरमध्ये एका विवाहीत जोडप्याला भाऊ-बहीण या नात्यात दखवल्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार वाद निर्माण केला आहे. दरम्यान, पूर्ण भाग प्रसारित झाल्यानंतर ही केवळ एक कौटुंबीक कल्पना ठरली. परंतू, तोपर्यंत एचयूएम टीवीवर कट करणे आणि समाजाला दुष्कृत्याकडे घेऊन जाणारे विषय घेतल्याचा आरोप आणि टीका करण्यात आली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)