Oral Sex: वाढदिवसाच्या पार्टीत 'ओरल सेक्स'वरुन वाद, मित्रावर चाकू हल्ला
या वादातून एका मित्रावर चाकूहल्ला (Knife Attack) करण्यात आला. हे प्रकरण कोर्टात गेले असून त्यावर सुनावणीही सुरु आहे.
वाढदिवसाच्या एका पार्टीत (Birthday Party) ओरल सेक्स (Oral Sex) या मद्द्यावरुन सुरु झालेला वाद विकोपाला गेला. या वादातून एका मित्रावर चाकूहल्ला (Knife Attack) करण्यात आला. हे प्रकरण कोर्टात गेले असून त्यावर सुनावणीही सुरु आहे. ख्रिस्तोफर मॉरिस नावाच्या व्यक्तीने नक्षिकाम असलेला सुरा शस्त्र म्हणून हातात घेतला आणि त्याच्या मित्राच्या मांडीत घुसवला. पोलीस जेव्हा घटनास्थळी आले जखमी व्यक्तीने सांगितले की, ख्रिस्तोफर हाच मुख्य संशयीत आरोपी आहे.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जखमी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याच्या मांडीला मोठी जखम झाली होती आणि रक्तस्त्राव झाल्याे ती जमीनवर पडली होती. पोलीस येताच त्याने काहीशी हालचाल करत हवेत हातवारे करत सांगितले की, ख्रिस्तोफर हाच मुख्य संशयीत आरोपी आहे. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहीका बोलाली. तोपर्यंत पोलीसांनीच त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पोलिसांनी आरोपीला तुरुंगात हजर केले तेव्हा न्यायाधीशाने कडक शब्दांत ताशेरे ओडत सांगितले की, ज्याने कुणी शस्त्र वापरुन हल्ला केला आहे, समोरच्याला गंभीर दुखापत केली आहे त्याला तत्काळ पोलीस कोठडीची आवश्यकता आहे.
स्वानसी क्राउन कोर्टात (Swansea Crown Court) सुनावणीवेळी सांगण्यात आले की, ही घटना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पोर्ट टॅलबोटमधील अलेक्झांड्रा स्ट्रीटमधील एका इमारतीत मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी ही घटना घडली होती. या प्रकरणातील फिर्यादी टॉम स्कॅपन्स याने म्हटले की, मित्राच्या पार्टीत सायंकाळी त्यांनी गांजा आणि मद्य सेवन (cannabis and alcohol) केले होते. नेमकी वेळ आठवत नाही पण त्या वेळी हल्लातील पीडित ली मोर्गन हा धुम्रपाण करण्यासाठी बाहेर गेला होता. (हेही वाचा, Oral Sex: महिला ओरल सेक्स म्हणजेच ब्लोजॉब देण्यासाठी का करतात टाळाटाळ? जाणुन घ्या यामागची कारणे)
सिगारेट ओढताना त्याची मैत्रिण आणि मित्र मॉरिस यांच्यात काही कारणावरुन वाद सुरु असल्याचे ऐकले. सिगारेट ओढायचे संपल्यानंतर त्याने दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद सुरु आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला लक्षात आले की, त्याचा मित्र आणि मैत्रिण दोघेही अस्वस्थ आहेत. अखेर तिने सांगितले की पार्टीतील दोन मित्रांनी तिला ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली. दबावात येऊन तिने ओरल सेक्स केला. यानंतर चिडलेल्या ली मोर्गन याने त्या मित्रांना आपल्या मालमत्तेतून (इमारतीचे आवार) बाहेर जाण्यास सांगितले. या वेळी त्यांच्यात जोरात वाद झाला.
फिर्यादी ली मोर्गन याने न्यायालयाला सांगितले की, हा वाद इतका टोकाला गेला की आरोपीने त्याच्यावर चाकूहल्ला केला. या चाकूच्या सहाय्याने आरोपींनी त्याच्या मांडीत जवळपास 10 इंच खोल इतकी जखम केली. मॉर्गनने हा फटका रोखण्यासाठी हात वर केला, तो असे करत असताना त्याचा अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये वार झाला. कोर्टाने मॉर्गन याची बाजू ऐकून घेतली आणि त्यानंतर दोषींना शिक्षा ठोठावली.