World's Oldest Man Dies: जगातील सर्वात वद्ध पुरुष Juan Vicente Perez Mora यांचे निधन

जगातील सर्वात वृद्ध माणूस म्हणून ओळखले जाणारे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे (Guinness World Records) दखल घेतले गेलेले जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे निधन झाले. ते 114 वर्षांचे होते. लवकरच त्यांचा 115 वा वाढदिवस साजरा केला जाणार होता. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.

Juan Vicente Perez Mora | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Venezuelan Juan Vicente Perez Mora Passes Away at 114: जगातील सर्वात वृद्ध माणूस म्हणून ओळखले जाणारे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे (Guinness World Records) दखल घेतले गेलेले जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे निधन झाले. ते 114 वर्षांचे होते. लवकरच त्यांचा 115 वा वाढदिवस साजरा केला जाणार होता. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होण्याचा विक्रम सॅटर्निनो दे ले फुएन्टो गार्सिया यांच्या नावावर होता. ते 112 वर्षे आणि 253 दिवसांचे आयुष्य जगले. दरम्यान, त्यांचा 4 फेब्रुवारी 2022 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गिनीजने जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून व्हिसेंट पेरेझ मोरा यांच्या नावाची घोषणा केली.

जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा हे आपल्या साध्या, सोप्या आणि सरळ जीवनशैलिमुळे दिर्घायुष्यी ठरले. आपल्या उल्लेखनीय आयुष्याचे श्रेय देताना त्यांनी एकदा म्हटले होते की, कठोर परिश्रम, सुट्टीच्या दिवशी विश्रांती, लवकर झोपण्याची सवय, रोजच्या रोज संतुलीत आहार घेणे आणि देवावरील अतूट विश्वास हाच आपल्या दीर्घायुष्याचा मंत्र असल्याचे त्यांनी म्हटले होते. गव्हर्नर फ्रेडी बर्नाल यांनी पेरेझ यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि त्यांचे वर्णन टॅचिरेन्स मूल्यांचे मूर्त स्वरूप म्हणून केले.

दरम्यान, जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांच्या पश्चात 41 नातवंडे, 18 पणतवंडे आणि 12 पणतू-नातवंडांसह असा परिवार आहे. 2022 च्या गिनीज स्टेटमेंटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्याचा प्रवास वयाच्या पाचव्या वर्षी सुरू झाला जेव्हा त्याने आपल्या कुटुंबासोबत शेतीमध्ये काम करण्यास सुरुवात केली, ऊस आणि कॉफी कापणीमध्ये मदत केली. कालांतराने ते दोन्ही महायुद्धे, टेलिव्हिजनचा शोध आणि चंद्रावर उतरणे यासारख्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होत गेले. विशेष म्हणजे सन 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारातूनही त्यांचे प्राण वाचले. जगभरात आलेल्या आणि अनकांना मृत्यूच्या कवेत घेतलेल्या कोरोनासोबत जुआन यांनी आत्मविश्वासाने लढा दिला.

एक्स पोस्ट

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनीही पेरेझ यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे कुटुंब आणि तचिरा राज्यातील एल कोब्रे येथील लोकांप्रती शोक व्यक्त केला. ते म्हणाले "जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा वयाच्या 114 व्या वर्षी अनंतकाळापर्यंत पोहोचले आहेत. जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे निधन हे एका युगाचा अंत आहे, ज्याने लवचिकता, विश्वास आणि जीवन जगण्याचा वारसा मागे टाकला आहे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, जगातील सर्वा वृद्ध व्यक्तीच्या जाण्याने जगभरातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार जगाने गमावला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now