Daughter of Kim Jong Un: उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन आपल्या मुलीसह प्रथमच दिसला सार्वजनिक ठिकाणी
किम जोंग उन हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता पाळतो. त्याच्या गुप्ततेसाठीही तो ओळखला जातो. परंतू, प्रथमच तो आपल्या मुलीसोबत दिलल्याने प्रसारमाध्यमांतून आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले जात आहे. कुटुंबातील छोट्या सदस्यासोबत किमने फेरफटका मारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता (North Korea’s Supreme Leader) किम जोंग उन (Kim Jong Un) हा नुकताच आपल्या लहान मुलीचा हात हातात घेऊन चालताना दिसला. खरे तर किम जोंग उन हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल कमालीची गुप्तता पाळतो. त्याच्या गुप्ततेसाठीही तो ओळखला जातो. परंतू, प्रथमच तो आपल्या मुलीसोबत दिलल्याने प्रसारमाध्यमांतून आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले जात आहे. कुटुंबातील छोट्या सदस्यासोबत किमने फेरफटका मारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
किम जोंग उन याच्याबद्दल KCNA ने छायाचित्रासह प्रसिद्ध केलेल्या वृत्तात मह्टले आहे की, किम आपल्या नेहमीच्या पेहरावात दिसतो आहे. तर, त्याची मुलगी पांढऱ्या रंगाचे जॅकेट परिधान करुन किमचा हात हातात धरुन त्याच्यासोबत निघाली आहे. ते दोघे एका लष्करी तळावर असल्याचे दिसते. बाबांचा हात हातात धरुन ही चिमुकली लष्करी उपकरणांकडे पाहात आहे. (हेही वाचा, North Korea: 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा)
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी किमसोबत दिसणाऱ्या त्या मुलीचे नाव दिले नाही. पण प्रसारमाध्यमांनी हे म्हटले आहे की, त्यांनी शुक्रवारी क्षेपणास्त्राच्या चाचणीचे निरीक्षण केले, KCNA ने सांगितले.
उत्तर कोरियाने प्योंगयांग इंटरनॅशनल एअरफील्डवरून इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Intercontinental Ballistic Missile) डागले जे शुक्रवारी जपानी जलप्रदेशात उतरले. या महिन्यात त्याच्या दुसऱ्या मोठ्या शस्त्रास्त्र चाचणीत कोरियाने अमेरिकेच्या सर्व मुख्य भूभागावर आण्विक हल्ले सुरू करण्याची संभाव्य शक्यता दर्शविली आहे. किम जोंग उन हा एक रहस्यमयी व्यक्ती आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)