Nobel Prize in Physics 2020 Winners: ब्लॅक होलवरील शोधाबद्दल Roger Penrose, Reinhard Genzel आणि Andrea Ghez यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

जगातील मानाच्या अशा नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize 2020) घोषणा सध्या केली जात आहे. काल औषध क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आता आज ब्लॅक होलवरील शोधाबद्दल रॉजर पेनरोस (Roger Penrose), रेनहार्ड गेन्झेल (Reinhard Genzel) आणि आंद्रिया घेझ (Andrea Ghez) यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

Roger Penrose, Reinhard Genzel and Andrea Ghez (Photo Credits: The Nobel Prize)

जगातील मानाच्या अशा नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize 2020) घोषणा सध्या केली जात आहे. काल औषध क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आता आज ब्लॅक होलवरील शोधाबद्दल रॉजर पेनरोस (Roger Penrose), रेनहार्ड गेन्झेल (Reinhard Genzel) आणि आंद्रिया घेझ (Andrea Ghez) यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2020 in physics) मंगळवारी घोषित करण्यात आला. रॉयल स्वीडन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने सांगितले की, भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2020 चे विभाजन करून, त्यातील अर्ध्या पुरस्काराचे मानकरी रॉजर पेनरोस असतील तर उरलेल्या अर्ध्याचे मानकरी रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया गेझ असतील.

पारितोषिकाची रक्कम, 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर मधील अर्धा हिस्सा पेनरोस यांना व दुसरा अर्धा हिस्सा संयुक्तपणे गेन्झेल व घेझ यांना वाटून देण्यात येईल. रॉजर पेनरोस यांना, 'ब्लॅक होलची निर्मिती ही सापेक्षतेच्या सर्वसाधारण सिद्धांताची भविष्यवाणी आहे', या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. रिनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया गेझ यांना, 'आकाशगंगेच्या मध्यभागी सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टचा शोध', यासाठी प्रतिष्ठित असा नोबेल मिळाला आहे. पेनरोझ यांनी हे सिद्ध केले की, सापेक्षतेचा सामान्य सिद्धांत ब्लॅक होल तयार करतो. गेन्झेल आणि गेझ यांना आढळले की, एक अदृश्य आणि अत्यंत अवजड वस्तू आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ताऱ्यांच्या कक्षा नियंत्रित करते. (हेही वाचा: Harvey J Alter, Michael Houghton आणि Charles M. Rice यांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर)

दरम्यान, रॉजर पेनरोस हे ब्रिटीश नागरिक असून, ते युनायटेड किंगडममधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेट. 1931 मध्ये जन्मलेल्या प्रोफेसर पेनरोस यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. रेनहार्ड गेन्झेल हे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म 1952 मध्ये जर्मनीच्या बॅड हॅमबर्ग व्होर डर हे येथे झाला होता. गेन्झेल यांनी 1978 मध्ये बॉन विद्यापीठातून आपली पीएचडी पूर्ण केली. 1965 मध्ये न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या गेझ यांनी 1992  मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पासडेना येथून पीएचडी केली होती. सध्या ते लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now