ये हुई ना बात! बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील देणार स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला
त्यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रात मंत्री होते. तसेच, ते कट्टर कॉंग्रेस नेते होते. त्यांच्या एकूण राजकीय प्रवासातील काँग्रेसबाहेरचा काही काळ वगळता ते आयुष्यभर काँग्रेसी राहिले. त्यांचे चुलते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत.
बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) यांची नात नीला विखे पाटील (Nila Vikhe Patil) या थेट स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला देणार आहेत. स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालय (Sweden Prime Ministers Office) सल्लागार म्हणून नुकतीच त्यांची निवड झाली. स्टीफन लोफवन (Stefan Lofven) यांनी पंतप्रधान (Prime Ministers) म्हणून स्वीडन (Sweden) देशाची सूत्रे जानेवारी महिन्यात हाती घेतली आहे. नीला या केवळ 32 वर्षांच्या आहेत. त्यांचे एकूण वय, अनुभव आणि कर्तृत्व पाहून देश विदेशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. नीला या अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. अशोक विखे पाटील (Ashok Vikhe Patil) हे ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ आहेत.
दरम्यान, अशोख विखे पाटील यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, नीला यांच्यावर पंतप्रधान कार्यालयात आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणी आदी कामांची जबाबदारी असेल. नीला या भारतीय वंशाच्या असून, त्यांचा जन्म स्वीडन येथे झाला आहे. सध्या त्या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. नीला यांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी माद्रीद कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चित आणि प्रभावी महिला)
दरम्यान, नीला यांची कौटुंबीक पार्श्वभूमीही राजकीय आहे. त्यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रात मंत्री होते. तसेच, ते कट्टर कॉंग्रेस नेते होते. त्यांच्या एकूण राजकीय प्रवासातील काँग्रेसबाहेरचा काही काळ वगळता ते आयुष्यभर काँग्रेसी राहिले. त्यांचे चुलते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्ष नेते आहेत.