New York Employee Files Lawsuit: व्यवस्थापनाने अयोग्य टेबल दिले, न्यूयॉर्क लायब्ररीमधील कर्मचाऱ्याने दाखल केला 4.6 दशलक्ष डॉलर्सचा दावा

आरोप आहे की, अपुऱ्या आकाराच्या डेस्कमुळे त्याच्यावर शारीरिक आणि भावनिक आघात झाला आहे.

Photo Credit- X

न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीच्या (New York Public Library) एका कर्मचाऱ्याने 4.6 दशलक्ष डॉलर्सच्या नुकसानभरपाईसाठी खटला (Employee Lawsuit) दाखल केला आहे. त्याने असा आरोप केला आहे की, कामाच्या ठिकाणी त्यास कमी जागा आणि अपुऱ्या आकाराच्या डेस्कवर नियुक्त (Workplace Accommodations) केल्याने त्याला गंभीर शारीरिक आणि भावनिक त्रास झाला. ग्रंथालय माहिती सहाय्यक विल्यम मार्टिन दावा करतात की, फिफ्थ एव्हेन्यूवरील स्टाव्ह्रोस निआर्कोस फाउंडेशन लायब्ररीमधील "क्रॅम्पी" डेस्क त्यांच्यासाठी आरामदायी नव्हता. सन्माननीय मार्टीन हे व्यक्तीमत्व साधारण 6 फूट 2 इंच उंच आणि तब्बल 163 किलोग्रॅम वजनाचे आहे.

शारीरिक आणि मानसिक तणावाचे आरोप

ब्रुकलिन फेडरल कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात, मार्टिनने त्यांना देण्यात आलेल्या 12 इंचाच्या आणि सातत्याने डूडडूगणाऱ्या (पातळी समान नसल्याने टेबल हालण्याची प्रक्रिया) टेबलचा उल्लेख केला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी आपल्या कायदेशीर तक्रारीत म्हटले आहे की, "मी फक्त माझ्या शारीरिक वैशिष्ट्यांनुसार योग्य निवासस्थानासह एक सेवा डेस्क मागितला होता. तोसुद्धा व्यवस्थापनाने दिला नाही. मार्टिनची अग्निपरीक्षा ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झाली. जेव्हा त्याला पहिल्यांदा डेस्कवर नियुक्त करण्यात आले. चिंता व्यक्त केल्यानंतर, त्याच्या व्यवस्थापनाने त्याला इतर डेस्कवर पुन्हा नियुक्त केले. तथापि, जून 2023 मध्ये, एका नवीन सहाय्यक संचालकाने त्याला त्याच समस्याप्रधान कामावर पुन्हा नियुक्त केले. (हेही वाचा, जगातली सर्वात बुटकी महिला Jyoti Amge आणि सर्वात उंच महिला Rumeysa Gelgi जेव्हा एकमेकींना भेटतात ( Watch Video))

शारीरिक, मानसिक त्रास झाल्याचा दावा

विल्यम मार्टिन यांनी म्हटले आहे की, व्यवस्थापनाने त्यांची वेगळ्या डेस्कवर केलेली नियुक्ती त्याच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हानिकारक होती. त्याने व्यवस्थापनावर कामाचा अतिरिक्त भार टाकल्याचाही आरोप केला आहे. दुसऱ्या बाजूला मार्टिनवर नंतर कामावर झोपल्याचा आरोप व्यवपस्थापनाकडून करण्यात आला, जो त्याने फेटाळला. दरम्यान, त्याला निलंबीत करण्या आले. निलंबनाच्या कारवाईनंतर त्याने कंपनीकडे शारीरिक, मानसिक आणि इतर बाबींचा त्रास झाल्याने आपण नैराश्येत गेल्याने वैद्यकीय खर्च आणि नुकसानभरपाई मागितली. त्याने त्याच्या वैद्यकीय रजेच्या विनंतीला मान्यता देण्यासाठी आणि त्याला 4.6 दशलक्ष डॉलर्स नुकसान भरपाई देण्यासाठी न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीच्या प्रवक्त्याने हा खटला आणि त्यात केलेले आरोप 'बिनबुडाचे आरोप' असल्याचे म्हटले आहे. सर्व आरोप फेटाळून लावत प्रवक्त्याने म्हटले की, 'आम्ही कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि चिंता अत्यंत गांभीर्याने घेतो आणि ग्रंथालयातील आमच्या कर्मचार्यांना निष्पक्षतेने आणि आदराने वागवण्यासाठी समर्पित आहोत.' सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.