भारताचे जावई झाले इंग्लंड चे नवे पंतप्रधान, आज घेणार पदाची सूत्रे हातात; जाणून घ्या काय आहे हे नाते
यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे बोरिस जॉन्सन चक्क भारताचे जावई आहेत. होय, आणि आपण भारताचे जावी असल्याचे बोरिस जॉन्सन यांनी बोलूनही दाखवले होते
गेल्या महिन्यात इंग्लंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिला. त्यांनतर नव्या पंतप्रधानांबाबत (British Prime Minister) सूत्रे हलण्यास सुरुवात झाली. या शर्यतीत परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट व माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्यामध्ये लढत झाली त्यात बाजी मारत बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे बोरिस जॉन्सन चक्क भारताचे जावई आहेत. होय, आणि आपण भारताचे जावी असल्याचे बोरिस जॉन्सन यांनी बोलूनही दाखवले होते. चला पाहूया काय आहे हे नाते.
तर बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर मरीना व्हीलर (Marina Wheeler) यांच्याशी दुसरा विवाह केला. मरीना व्हीलर यांचा जन्म, बीबीसी संवाददाता सर चार्ल्स व्हीलर आणि त्यांची दुसरी पत्नी दीप सिंग यांच्या पोटी झाला. दीप सिंग या भारतीय सिख होत्या. त्यांचे मूळ पूर्वज हे पश्चिम पंजाब, पाकिस्तानमधील सरगोधा गावचे. 1947 च्या भारत पाकिस्तान फाळणीनंतर ते भारतात परतले. अशाप्रकारे मरीना व्हीलर या अर्ध्या भारतीय आहेत. त्यामुळे इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारताचे जावी ठरत आहेत. (हेही वाचा: लंडन: भारतीय वंशाचा अवघा 15 वर्षीय रणवीर सिंग साधू ब्रिटन मधील Youngest Accountant)
मरीना व्हीलर या ब्रिटिश वकील, लेखक आणि स्तंभलेखक आहेत. बॅरिस्टर म्हणून, त्या मानवी हक्कांसह सार्वजनिक कायद्यामध्ये निष्णात आहेत. त्या बार अनुशासनात्मक न्यायाधिकरणाच्या सदस्य आहेत. 2016 मध्ये त्यांची इंग्लंडच्या राणीचा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, जॉन्सन हे ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते असून, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांना 87.4 टक्के मते मिळाली होती. आज (बुधवारी) ते पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.