Netflix आणि Amazon Prime संकेतशब्द शेअर केल्यास 'या' देशात करावा लागणार Criminal Charges चा सामना

नेटफ्लिक्स (Netflix) किंवा अमेझॉन प्राईम (Amazon Prime) यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची वर्गणी भरुन तुम्ही जर सदस्यत्व घेतले असेल आणि जर तुम्ही त्याचा संकेतशब्द (Netflix & Amazon Prime passwords Passwords) इतरांना शेअर करत असाल तर, तुम्हला सावध राहण्याची गरज आहे.

Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नेटफ्लिक्स (Netflix) किंवा अमेझॉन प्राईम (Amazon Prime) यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मची वर्गणी भरुन तुम्ही जर सदस्यत्व घेतले असेल आणि जर तुम्ही त्याचा संकेतशब्द (Netflix & Amazon Prime passwords Passwords) इतरांना शेअर करत असाल तर, तुम्हला सावध राहण्याची गरज आहे. अर्थात तुम्ही जर युके (UK) म्हणजेच युनायटेड किंग्डम (United Kingdom) मध्ये राहात नसाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण, तुम्ही जर या देशात राहात असाल आणि असे कृत्य (Password-Sharing Practice) करत असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. इतकेच नव्हे तर तुम्हाला कोर्टात देखील खेचले जाऊ शकते.

युकेच्या बौद्धिक संपदा कार्यालयाने (IPO) संकेतशब्द (Passwords) शेअर करण्याची पद्धत गुन्हा असल्याचे म्हटले आहे. Netflix च्या नियम आणि अटींनुसार लोक मित्र किंवा घराबाहेरील लोकांसह पासवर्ड शेअर करू शकत नाहीत. असे असूनही अनेक वापरकर्त्यांसोबत संकेतशब्द शेअर करणे ही एक सामान्य प्रथाच बनली आहे. यावर बौद्धिक संपदा कार्यालयाचे म्हणने असे की, पासवर्ड शेअर करणे बेकायदेशीर आहे. कारण ते कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करते. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मकडे लोकांना कोर्टात खेचण्याचे अधिकार आहेत. (हेही वाचा, Netflix सबस्क्रिप्शन रिन्यू करणे पडले महागात, ऑनलाइन फसवणुकीत गमावले 1 लाख रुपय)

केवळ भारतच नव्हे तर जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांसाठी पायरसी ही एक प्रमुख समस्या आहे. तुमच्या सोशल मीडियामध्ये परवानगीशिवाय इंटरनेट प्रतिमा पेस्ट करणे किंवा पायरसीद्वारे चित्रपट, टीव्ही मालिका किंवा थेट क्रीडा इव्हेंट्स, हॅक केलेल्या फायर स्टिक्स किंवा अॅप्समध्ये सदस्यता न घेता पाहणे हे कॉपीराइटचे उल्लंघन आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा गुन्हा करत असाल तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे युकेच्या IPO ने म्हटले आहे