नेस्ले कंपनी वादात, लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचा समावेश; भारतासह दुर्बल देशांमध्ये विक्री- रिपोर्ट
विशेष म्हणजे ही खाद्य पदार्थ भारतासह ज्या देशांची आर्थिकव्यवस्था खराब आहे अशा देशांना पाठवली जातात, असा आरोप करण्यात आला आहे.
Nestle : नेस्ले ही जगातील सर्वात मोठी ग्राहकोपयोगी वस्तूंचा पुरवठा करणारी कंपनी आहे. लहानांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत त्यांची उत्पादने सर्वांना आवडतात. मात्र, कंपनीकडून लहान मुलांच्या उत्पादनात साखरेचा समावेश होत असल्याचा आरोप नेस्लेवर करण्यात आला आहे. 15 सेरेलॅक खाद्य पदार्थांमध्ये प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सरासरी 3 ग्रॅम साखर असते असे एका रिपोर्टवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे ही प्रोडक्ट भारतासह अन्य देशांत विकली जातात. जे आर्थिक दृष्या दुर्बल आहेत. (हेही वाचा :चिनी कंपनीची 'Unhappy Leave' पॉलिसी; काम करण्याची इच्छा नसल्यास मिळते १० दिवसांची सुट्टी, नेमक प्रकरण काय? )
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेस्लेच्या भारतातील दोन सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्टमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे. याउलट, युनायटेड किंगडम, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इतर विकसित देशांमध्ये हीच उत्पादने साखरमुक्त आहेत. भारतात, सर्व 15 सेरेलॅक बेबी उत्पादनांमध्ये प्रति सर्व्हिंग सरासरी 3 ग्रॅम साखर असते. हीच उत्पादने जर्मनी आणि यूकेमध्ये साखरेशिवाय विकली जातात. पण त्यात साखर नसते. त्याशिवाय, इथिओपिया आणि थायलंडमधील उत्पादनामध्ये प्रत्येकी सर्व्हिंगमध्ये सुमारे 6 ग्रॅम साखर असते.
नेस्ले त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर सर्व गोष्टींचे प्रमाण जाहीर करते. ज्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असतो. मात्र, उपलब्ध माहितेमध्ये साखरेचा समावेश करत नाही किंबहून केला तर त्यात पारदर्शकता नसते, असे अहवालात म्हटले आहे. तज्ज्ञांचे मते बाळाच्या उत्पादनांमध्ये साखरेचा समावेश ही एक धोकादायक आणि अनावश्यक बाब आहे.
ब्राझीलमधील फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पराइबाच्या पोषण विभागातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक रॉड्रिगो व्हियाना यांनी या या गोष्टींवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखर घालू नये. अन्यथा त्याचे व्यसन होईल परिणामी त्याचा वाईट परिणाम प्रौढ जीवनात विकार उद्भवतील. ज्यात लठ्ठपणा, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब या सारख्या आजारांचा समावेश आहे. आरोपांना उत्तर देताना, नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, गेल्या पाच वर्षांत, नेस्ले इंडियाने त्यांच्या बेबी फूड प्रॉडक्टमध्ये 30% पर्यंत साखर कमी करण्यात आली आहे.