भारतीय चलनातील 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर नेपाळमध्ये बंदी
तसंच हा निर्णय तात्काळ लागू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
भारतात मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन सुमारे दोन वर्ष झाली. त्यानंतर आता नेपाळनेही नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. नेपाळ (Nepal) सरकारने 100 रुपयांहून अधिक किंमतीच्या भारतीय नोटांवर बंदी घातली आहे. तसंच हा निर्णय तात्काळ लागू करण्याचे आदेश नेपाळ सरकारने दिले आहेत.
काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, सरकारने 100 रुपयांहून अधिक म्हणजे 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा न बाळगण्याचे आवाहन लोकांना केले आहे. फक्त 100 रुपयांची भारतीय नोटचं नेपाळमध्ये चलनात राहील.
नेपाळमध्ये भारतीय नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर करण्यात आली. त्यात भारत सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्याने नेपाळमध्ये भारतीय नोटा करोडोमध्ये अडकून पडल्या आहेत.