पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 7 वर्षांची शिक्षा; भ्रष्टाचार प्रकरणात दोषी
न्यायालयाने अत्यंत मोजक्या शब्दांत आपला निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की, 'फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट प्रकरणात आरोपींविरोधात कोणतीही केस दाखल होऊ शकत नाही. अल अजीझ स्टील मिल प्रकरणात आरोप सिद्ध होत आहेत.'
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान (Nawaz Sharif) नवाज शरीफ हे भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. त्यांना तब्बल सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयात (Islamabad Court) खटल्यावर सुनावनी सुरु असताना सोमवारी हा निर्णय देण्यात आला. अजीजिया स्टील मिल प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा ६८ वर्षीय नवाज शरीफ कमालीचे शांत होते. त्यांना 2.5 अब्ज रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
द डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती अरशद मलिक यांनी नवाज शरीफ न्यायालयात आल्यावर काही मिनिटांमध्येच आपला निर्णय दिला. न्यायालयाने अत्यंत मोजक्या शब्दांत आपला निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की, 'फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट प्रकरणात आरोपींविरोधात कोणतीही केस दाखल होऊ शकत नाही. अल अजीझ स्टील मिल प्रकरणात आरोप सिद्ध होत आहेत.' (हेही वाचा, छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू शेखला अटक; सोबत मिळाला पाकिस्तानी पासपोर्ट)
नवाज शरीफ सध्या राजकीय वनवासात आहेत. पण, तरीही त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते पाकिस्तानात प्रचंड आहेत. न्यायालयाचा निर्णय ऐकण्यासाठी त्यांच्या असंख्य कार्यकर्ते आणि चाहत्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा, शरीफ अत्यंत शांत होते.