महिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)

सोशल मिडीयावर स्वतःचा बिकिनीमधील फोटो पोस्ट केल्याने या डॉक्टरचा चक्क वैद्यकीय परवाना (Medical Licence) रद्द केला आहे.

Nang Mwe San (Photo Credit : Facebook)

सध्या जवळ जवळ प्रत्येक देशाने पुरुषांइतकेच स्वातंत्र्य स्त्रियांनाही दिले आहे. आजकाल स्त्रिया अगदी करियर निवडण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. मात्र म्यानमार (Myanmar) मधील एका महिला डॉक्टरला हाच स्वतंत्र बाणा अंगालटी आला आहे. सोशल मिडीयावर स्वतःचा बिकिनीमधील फोटो पोस्ट केल्याने या डॉक्टरचा चक्क वैद्यकीय परवाना (Medical Licence) रद्द केला आहे. Nang Mwe San असे या महिला डॉक्टरचे नाव असून तिने सरकारच्या या निर्णयावर पुनर्विचार केला जावा अशी याचिका दाखल केली आहे.

29 वर्षीय Nang Mwe San यांनी 5 वर्षांपूर्वी आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली होती. 2 वर्षांपासून त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही काम करायला सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांनी कमी कपड्यातले अनेक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. (हेही वाचा: Bigg Boss च्या घरात प्रवेश करणारी Hot आणि Sexy हीना पांचाळ नक्की आहे कोण? (Photos))

हे सर्व फोटो बर्मिज संस्कृतीला अशोभनीय आहेत, त्यामुळे असे फोटो पोस्ट करू नये अशी ताकीद त्यांना देण्यात आली होती. तरीही त्यांनी असे फोटो पोस्ट करणे चालूच ठेवले होते. अखेर त्यांनी एक बिकिनी मधील फोटो पोस्ट केल्यानंतर आता त्यांचा वैद्यकीय परवानाच रद्द करण्यात आला आहे.

याबाबत बोलताना Nang Mwe San म्हणाल्या, ‘वैद्यकीय क्षेत्रात कोणता एका ठराविक ड्रेसकोड नाही. मी जेव्हा पेशंट्सना भेटते तेव्हा असे कोणतेही आक्षेपार्ह कपडे घालत नाही. मी जे फोटो पोस्ट केले आहेत ते माझ्या वैयक्तिक खात्यावर केले आहेत, ज्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारला काहीही अधिकार नाही.’ दरम्यान सध्या म्यानमारमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे, त्यामुळे संस्कृतीचे कारण देऊन अशाप्रकारे परवाना रद्द करणे योग्य आहे का? असा प्रश्न नेटीझम्सकडून विचारला जात आहे.