Mother Killed Son: आईने स्वतःच्या मुलाची केली हत्या; शरीराचे तुकडे करून शिजवून डोके खाल्ले, जाणून घ्या धक्कादायक कारण
तिची मानसिक स्थिती बरी नसल्याची अनेकांनी पुष्टी केली. आता पोलीस तिला रुग्णालयात दाखल करणार आहेत.
इजिप्तमध्ये (Egypt) आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर महिलेने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते शिजवून मृतदेहाचे डोके खाल्ले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 29 वर्षीय महिलेचे नाव हाना (Hanaa) आहे. हाना तिच्या पतीपासून अनेक वर्षांपासून विभक्त असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने आपला मुलगा युसूफची हत्या केवळ यासाठी केली कारण तिला वाटत होते की तिचे मूल कायमस्वरूपी तिच्यासोबत राहावे. तिचा विश्वास होता की तिने मुलाच्या शरीराचे तुकडे खाल्ल्यावर मुल परत तिच्या पोटी जन्म घेईल.
मुलाचे काका जेव्हा महिलेच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना मुलाच्या शरीराच्या तुकडे एका बदलीमध्ये भरून ठेवलेले आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी महिलेला अॅश शार्किया राज्यातील फॅकस शहरात तिच्या घरातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हानाने मुलाचे अवशेष घरात बादल्यांमध्ये ठेवले होते. हानाने पोलिसांना सांगितले की, तिला जोसेफला मारायचे नव्हते.
ती म्हणाली की, ती मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिने हे धक्कादायक कृत्य केले. तपासादरम्यान तिची मानसिक स्थितीही तपासली जाणार असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि हत्येमागील नेमका हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला अपस्मार आणि इतर काही मानसिक विकारांनी त्रस्त आहे. तिची मानसिक स्थिती बरी नसल्याची अनेकांनी पुष्टी केली. आता पोलीस तिला रुग्णालयात दाखल करणार आहेत. (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये कबरी खोदून मृतदेहांवर बलात्कार; मुलींच्या कबरींना कुलूप लावत आहेत पालक)
याआधी इजिप्तमध्ये अशाच एका घटनेत एका महिलेने आपल्या तीन मुलांची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि ती डिप्रेशनमध्ये होती.