भारताला मोठा धक्का, देशाबाहेर पळालेल्या मेहुल चोक्सी याने भारतीय नागरिकत्व सोडले
पंजाब नॅशनल बँकेला (PNB) करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul choksi) याला भारतात आणणे मुश्किल झाले आहे.
पंजाब नॅशनल बँकेला (PNB) करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला भारतात आणणे मुश्किल झाले आहे. देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांमधील एक मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. एबीपी न्युजने दिलेल्या माहितीनुसार, चोक्सी याने त्याचा पासपोर्ट एंटीगुआ येथील उच्चायुक्तांच्या कार्यलयात जमा केले आहे. त्यामुळे चोक्सीला आता भारतात आणणे केंद्र सरकारला मुश्किल होणार आहे.
चोक्सी याचा पासपोर्ट क्रमांक Z3396732 हा कॅन्सल बुक सोबत जमा केला आहे. तर नागरिकता सोडण्यासाठी चोक्सी याने 177 डॉलर भरले आहेत. याबाबत विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी गृह मंत्रालयाला सूचना दिली आहे. चोक्सीने आता त्याचा नवीन घराचा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस एंटीगुआ असा सांगितला आहे. तर चोक्सीने आवश्यक नियमांचे पालन करुन भारतीय नागरिकत्व सोडून एंटीगुआचे नागरिकत्व स्विकारले आहे. परंतु चोक्सीने भारतीय प्रत्यार्पणाच्या कारवाई पासून वाचणे हा त्यामागील महत्वाचा मुद्दा आहे. या बाबत येत्या 22 फेब्रुवारी,2019 रोजी सुनावणी होणार आहे. (हेही वाचा-नीरव मोदीच्या अलिबागमधील अनधिकृत बंगल्यावर कारवाई)
प्रधानमंत्री कार्यालयाने चोक्सीने नागरिकत्व सोडल्याबाबत विदेश मंत्रालय आणि तपासणी कंपनीकडे प्रगती रिपोर्ट्स मागितले आहे. 2017 रोजी चोक्सी याने एंटीगुआचे नागरिकत्व स्विकारले आहे. त्यावेळी भारताने चोक्सीवर कोणतीही आपत्ती दर्शविली नव्हती. तसेच भारतीय पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर चोक्सीला एंटीगुआचे नागरिकत्व मिळाले.
पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी (Nirav Modi) देश सोडून फरार झाले. या प्रकरणी विशेष संस्था आणि सीबीआयकडून अधिक तपासणी केली जात आहे. आता पर्यंत या दोघांची चार हजार करोड रुपयांच्या संपत्तीवर जप्ती आणली आहे. तर दोघांवर आर्थिक फरार आरोपी अधिनियमानुसार कारवाई केली जात आहे.
यापूर्वी चोक्सी याने ईडीने दाखल केलेल्या याचिका फेटाळण्यासाठी 34 पानांचे उत्तर पाठवले होते. ज्यामध्ये चोक्सीने त्याच्या प्रकृती बाबत दाखला देत त्याला 41 तासांचा प्रवास करुन भारतात येणे शक्य नसल्याचे सांगितले होते.