Medical Product Alert: भारतातील खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO ने जारी केला अलर्ट; 66 मुलांच्या मृत्युनंतर संस्थेने घेतला निर्णय

अशी उत्पादने आतापर्यंत फक्त गॅम्बियामध्ये आढळली आहेत व ती इतर देशांनाही पुरवले गेले असण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओने आज गाम्बियामध्ये ओळखल्या गेलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे.

Cough & Cold Syrups (संग्रहित संपादित प्रतिमा)

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय कंपनी मेडेन फार्मास्युटिकल्सने (Maiden Pharmaceuticals Limited) बनवलेल्या चार खोकला आणि सर्दी सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. या कफ सिरपमुळे गांबिया देशातील 66 मुलांचा मृत्यू झाला असू शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. आरोग्य संघटनेने आपल्या एका वैद्यकीय अलर्टमध्ये म्हटले आहे की, प्रयोगशाळेत चार उत्पादनांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले, ज्याने पुष्टी केली की या उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अस्वीकार्य मात्रा आहे.

डब्ल्यूएचओने चेतावणी दिली की ही उत्पादने इतर देशांमध्ये देखील वितरित केले जाऊ शकतात. या प्रकरणाबाबत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, या चार औषधांमध्ये मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने भारतात बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपचा समावेश आहे. डब्ल्यूएचओ रुग्णांना पुढील हानी टाळण्यासाठी सर्व देशांमध्ये अशी उत्पादने शोधून काढून ती टाकण्याची शिफारस करतो.

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गॅम्बियामध्ये साठ मुलांचा मृत्यू झाला होता. खोकल्याचे कोणतेतरी सिरप प्यायल्यानंतर या मुलांच्या किडनीच्या समस्या समोर आल्या. सध्या या मृत्यूंमागील कारणांचा शोध सरकार घेत आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, ते भारतातील कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मेडेन फार्मास्युटिकल्सने यावर भाष्य करण्यास नकार दिला. (हेही वाचा: रशियाकडून Nuclear Attack ची जोरदार तयारी? युक्रेनच्या फ्रंट लाईनकडे जाणाऱ्या अण्वस्त्रांच्या ताफ्याचा व्हिडीओ व्हायरल)

अशी उत्पादने आतापर्यंत फक्त गॅम्बियामध्ये आढळली आहेत व ती इतर देशांनाही पुरवले गेले असण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओने आज गाम्बियामध्ये ओळखल्या गेलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे ज्याचा 66 मुलांच्या मृत्यूंचा संभाव्य संबंध आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now