Advisory for Indian Nationals and Students in Canada: कॅनडा मधील भारतीय विद्यार्थी, पर्यटकांना 'सतर्क' राहण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना; जाणून घ्या यामागील नेमकं कारण

सरकारने भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ओटावा किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय मिशनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

Canada | PC: Pixabay.com

भारतामधून कॅनडा (Canada) जाणार्‍या विद्यार्थी आणि पर्यटकांना 'सतर्क' राहण्याचं आवाहन भारत सरकार कडून करण्यात आलं आहे. सध्या तेथे वाढत असलेल्या भारत सरकार विरोधी कारवाया पाहता आणि हेट क्राईमची (Hate Crime) प्रकरणं पाहता हा अलर्ट देण्यात आला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (Ministry of External Affairs) कडून अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. हेट क्राईमच्या प्रकरणांबाबत भारत सरकार कडून कॅनडा सरकार सोबत बोलणी सुरू आहेत पण अद्याप त्यावर कोणतीही आरोपींवर कारवाई झालेली नाही त्यामुळे भारतीयांनी सतर्क राहणं गरजेचे आहे.

सरकारने भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ओटावा किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय मिशनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भारतीय उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना कॅनडातील भारतीय नागरिकांशी संपर्कात राहणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल असं सांगण्यात आले आहे.

पहा अ‍ॅडव्हायजरी

काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी टोरंटो येथील एका प्रमुख हिंदू मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्रे तयार करून विद्रुपीकरण केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेला द्वेषपूर्ण गुन्हा ठरवत भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. हे देखील नक्की वाचा: Shehbaz Sharif यांच्या काश्मीर वक्तव्यावर भारताचं पाकिस्तानला प्रत्युत्तर, संयुक्त राष्ट्रांच्या सभेत भारताचे सचिव मिजितो विनिटोंनी घेतला खरपूस समाचार.

टोरंटोच्या BAPS स्वामीनारायण मंदिरात ही घटना कधी घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण टोरंटोमधील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी ट्विट केले की, “आम्ही टोरंटोमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या भारतविरोधी भित्तिचित्रांसह केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करून आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.