महिला कर्मचाऱ्यासोबत अफेअर ठेवल्याने McDonald च्या सीईओने गमावली नोकरी

त्यामुळे ईस्टपब्रुक यांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे.

Steve Easterbrook (Photo Credits-Twitter)

देशातील सर्वात मोठी फास्ट फूड कंपनी मॅकडोनल्ड्सचे (McDonald) सीईओ (ECO) स्टीव ईस्टरब्रुक (Steve Easterbrook) यांनी त्यांच्याच सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत अफेअर ठेवले. त्यामुळे ईस्टपब्रुक यांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे. कंपनीचे निर्देशक मंडल यांना असे कळले की, सहकर्मचाऱ्यांसोबतच ईस्टपब्रुक यांचे अफेअर सुरु होते. त्यामुळे तातडीने त्याच्यांवर कारवाई करत नोकरीवरुन काढून टाकले आहे.

निर्देशक बोर्डकडून ईस्टरब्रुक यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लघंन केल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. कंपनीच्या मते, ईस्टरब्रुक यांच्या जागी क्रिस केम्पजिंक्सी यांना सीईओ पद देण्यात आले आहे. जे मॅकडोन्ड्सचे युएसए मधील माजी अध्यक्ष होते. ईस्टरब्रुक यांनी सहकर्मचाऱ्यासोबत अफेअर ठेवणे ही आपली चुक असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या काही नियमांअंतर्गत करण्यात आलेली कारवाई सोबक मी सहभागी आहे. त्यामुळे आता कंपनी सोडून मला पुढची वाटचाल करण्याची वेळ आली आहे.(Dominos Pizza भारतात बंद होण्याच्या वाटेवर; स्वीडन सह या 4 देशांतील आऊटलेट्स झाले बंद)

मात्र कंपनीने सीईओ यांना त्यांच्या प्रेमसंबंधामुळे नोकरीवरुन काढल्याबात अधिक माहिती दिली नाही आहे. तसेच अधिक आम्ही माहिती देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. संडे टाइम्स यांच्या मते, युके ऑपरेशन्सचे माजी अध्यक्ष ईस्टरब्रुक यांचा यापूर्वी घटस्फोट झालेला आहे. तर काही कंपन्यांनी मीटू चळवळीदरम्यान कर्मचाऱ्याने त्यांच्या सहयोगी सोबत डेटिंग आणि पर्सनल संबंध ठेवल्याने त्याच्या विरोधातील काही नियम तयार केले आहेत.