Mayor Marries Teen: काय सांगता? 65 वर्षीय महापौरांनी केले 16 वर्षांच्या शाळकरी मुलीशी 7वे लग्न; विरोधानंतर द्यावा लागला राजीनामा

गेल्या वर्षी तिने ‘मिस अरौकारिया’ स्पर्धेत किशोर वर्गात (15 ते 17 वयोगटातील मुलींसाठी) भाग घेतला होता व त्यात ती दुसरी आली.

Hissam Hussein Dehaini (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्राझीलचे (Brazil) कोट्याधीश महापौर हिसम हुसेन देहैनी (Hissam Hussein Dehaini) यांनी वयाच्या 65 व्या वर्षी 7वे लग्न केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांची नवीन पत्नी फक्त 16 वर्षांची आहे आणि ती एक शाळकरी मुलगी आहे. सांगितले जात आहे की याआधी देहैनी यांनी 6 वेळा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न 43 वर्षांपूर्वी 1980 मध्ये झाले होते. हिसम हुसेन देहैनी यांना आतापर्यंत 16 मुले झाली आहेत. परंतु या नव्या लग्नामुळे ते अडचणीत सापडले आहेत. इतक्या छोट्या मुलीशी लग्न केल्याने त्यांना आता त्यांच्या राजकीय पक्षाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देहैनी यांच्यावर आधी ड्रग्ज घेतल्याचाही आरोप आहे.

ब्राझीलच्या पराना (Paraná) राज्यातील अरौकारियाचे (Araucaria) महापौर, हिसम हुसेन देहैनी यांनी गेल्या महिन्यात काउने रोडे कॅमार्गोशी (Kauane Rode Camargo) लग्न केले. लग्नाच्या एक दिवस आधी काउने 16 वर्षांची झाली. हिसम यांची नवी पत्नी, काउने ‘बाल सौंदर्य राणी’ आहे. गेल्या वर्षी तिने ‘मिस अरौकारिया’ स्पर्धेत किशोर वर्गात (15 ते 17 वयोगटातील मुलींसाठी) भाग घेतला होता व त्यात ती दुसरी आली. लग्नाआधी हिसम यांनी आपल्या भावी पत्नीच्या दोन नातेवाईकांना उच्च पदावर नियुक्त केले होते. यामध्ये काउनेच्या आईचाही समावेश आहे. देहैनी हे दुसऱ्यांदा महापौर झाले आहेत. त्यांच्या मुली आणि माजी पत्नींनाही सरकारी पदे देण्यात आली आहेत.

याआधी 2000 मध्ये हिसम यांना 100 दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर अंमली पदार्थ तस्करीचा आरोप होता. तसेच त्यांच्यावर ड्रग्ज लॅब चालवण्याचा आणि पोलिसांशी संगनमत करून ड्रग्ज तस्करांना वाचवल्याचाही आरोप होता. भारतीय रुपयांमध्ये त्याची संपत्ती 23 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. ते सिदादानिया राजकीय पक्षाचे सदस्य होते, परंतु आता त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. (हेही वाचा: Condom Cafe: थायलंडमध्ये सुरु झाला कंडोम थीमवर आधारीत अनोखा कॅफे; Safe Sex बद्दल जागरूकता पसरवणे हा उद्देश)

दरम्यान, तरुण वयात लग्न करण्याच्या बाबतीत ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे. जर पालकांनी परवानगी दिली तर मुलीचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न होऊ शकते. त्यामुळे आता अरौकेरियाची फर्स्ट लेडी अजूनही शाळेत जाते. त्यांच्या नव्या लग्नानंतर ब्राझीलमध्ये त्यांना मोठा विरोध झाला आणि हेच त्यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले. ते एक मोठे व्यापारीही आहेत.