Martial Arts Athlete Calls Police: पोलिसांना बोलावल्याने मार्शल आर्ट खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल, शिवीगाळ प्रकरणी नेटीझन्सकडून खिल्ली
यावरुन नाराज झालेल्या नेटीझन्सनी तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली आहे. आरोपीला स्वत: चोप न देता पोलिसांशी का संपर्क केला असा सवाल तिला केला जात आहे. ज्याचे तिने स्पष्टीकरण दिले आहे.
चिनमधील एक महिला संमिश्र मार्शल आर्ट (Mixed Martial Arts) खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. दैनंदिन काम आटोपून घरी जाताना तिला लैंगिक छळाचा सामना (Sexual Harassment) करावा लागला. या वेळी आरोपीस स्वत: प्रतिकार न करता तिने पोलिसांशी संपर्क साधला. हे पाहून नेटीझन्स नाराज झाले. नेटीझन्सची अपेक्षा अशी की, स्वत: मार्शल आर्ट खेळाडू असलेल्या या महिलेने स्वत:च गुन्हेगारास चोप द्यायला हवा होता. त्याऐवजी तिने ऑनलाईन तक्रार नोंदवत पोलिसांना पाचारण केले, असे मत सोशल मीडियावर (Social Media) नेटीझन्सनी व्यक्त केला आहे.
आरोपीकडून महिलेची छेडछाड
साऊथ चायना पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, महिला मार्शल आर्ट खेळाडू जू आपले दैनंदिन कामकाज आटोपून घरी परतत होती. दरम्यान, जियांग झोऊ नावाचा एक तरुण तिथे धावत आला आणि त्याने तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिने मदत करण्याऐवजी पोलिसांशी संपर्क साधला आणि कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला.
खाजगी माहितीची विचारणा आणि जबरदस्तीने चुंबनाचा प्रयत्न
दरम्यान, आरोपी जियांग झोऊ हा जू हिच्याजवळ आला आणि तो तिला दमदाटी करु लागला. त्याने तिच्याकडे तिचा राहण्याचा पत्ता आणि फोन क्रमांकही मागितला. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण आरोपीचे बळ वाढले. त्याने अचानक तिचा हात पकडला आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याने तिस जबरदस्तीने चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. आरोपीचा प्रयत्न पाहून झोऊने त्याला तिच्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, झटापटीत ती खाली कोसळली, तिच्या लक्षात आले की, आरोपीने हातात सुरा पकडला आहे आणि तो आक्रमक होऊन चढाई करण्याच्या प्रयत्नात आहे. तिने समयसूचकता दाखवत पोलिसांशी संपर्क केला. काहीच वेळात पोलीस तेथे आले आणि आरोपीला अटक केली. (हेही वाचा, Sikkim Sexual Harassment: दिव्यांग महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक)
आरोपीस अटक, गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर महिलेच्या अपरहणाचा प्रयत्न, विनयभंग अशा प्रकारचे आरोप ठेवले असून गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियात संमीश्र भावना उमटत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त करत म्हटल आहे की, स्वत: मार्शल आर्ट असताना पोलिसांची कशाला वाट पाहायची? स्वत:च चोपायचाकी त्या आरोपीला.
साऊत चायना पोस्टच्या हवाल्याने वृत्त देताना मींटने म्हटले आहे की, झू स्वत: पाठिमागील तीन वर्षांपासून मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. तरीदेखील तिने आरोपीचा प्रतिकार करताना कायदा हातात घेतला नाही. थेट पोलिसांशी संपर्क साधला. कारण, ती एक प्रशिक्षीत खेळाडू आहे. तिने मारहाण करण्याचा निर्णय घेतला असता तर, आरोपी गंभीर जखमी झाला असता. त्यामुळे काळजीपोटी तिने पोलिसांना संपर्क केला.
मी एक व्यवसायिक मार्शल आर्ट खेळाडू आहे. माझे गुद्दे जाम ताकदवान असतात. सामान्य व्यक्तीस ते सहन करता येत नाहीत. त्यामुळे समोरच्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशा वेळी आपला बचाव करत पोलिसांना पाचारण करणे केव्हाही चांगले. त्यामुळे केवळ भीती आणि परिणामांची चिंता याच कारणामुळे आपण पोलिसांना पाचारण केल्याचे पीडिता जू ने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.