काय सांगता? जेफ बेजोस यांची पूर्वाश्रमीची पत्नी MacKenzie Scott यांनी केले 19,800 कोटींचे दान; 286 संघटनांना मिळाली मदत
वर्षभरातील ही त्यांची तिसरी मोठी देणगी आहे
जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आणि अॅमेझॉन चीफ जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची माजी पत्नी मॅकेन्झी स्कॉट (Mackenzie Scott) यांनी त्यांच्या संपत्तीमधून सुमारे 2.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 19,800 कोटी रुपये दान केले आहेत. वर्षभरातील ही त्यांची तिसरी मोठी देणगी आहे. या देणगीचा फायदा भारतासह जगभरातील सुमारे 283 संस्थांना झाला आहे. बेजोसपासून घटस्फोट घेतलेल्या मॅकेन्झी त्यांच्या दानशूर वृत्तीसाठी ओळखल्या जातात. जुलै 2020 पासून त्यांनी 8.5 अब्ज रुपये दान केले आहेत. त्यांच्या सध्याच्या देणगीमुळे गिव इंडिया, गुंज, अंतरा फाउंडेशन यासारख्या भारतीय संस्थांनाही मदत झाली आहे.
मॅकेन्झीने यांनी 2019 मध्ये जेफ बेझोसशी घटस्फोट घेऊन डॅन जावेटशी लग्न केले. बेझोसपासून घटस्फोटानंतर मॅकेन्झी स्कॉट यांना अॅमेझॉनमधील 4 टक्के हिस्सा मिळाला, ज्याचे मूल्य सुमारे 60 अब्ज डॉलर्स आहे. गेल्या वर्षी केवळ एका वर्षात सर्वाधिक दान देण्याचा विक्रम त्याने केला आहे.
परोपकारासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅकेन्झी यांनी ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, अधिक संपत्ती फक्त काही हातांमध्ये मर्यादित राहिली नाही, तर ते जगासाठी चांगले होईल. मॅकेन्झी यांची स्वतःची कोणतीही सेवाभावी संस्था नाही, त्या ही रक्कम खाजगीमध्ये दान करत आहेत. मात्र, संस्थांनी मॅकेन्झीकडून देणग्या घेण्यासाठी केलेला अर्ज आणि त्याबाबतची निवड याबद्दल कोणताही औपचारिक मार्ग अद्याप समोर आला नाही. ताज्या देणगीबाबतही त्यांनी प्रत्येक संस्थेला मिळालेली रक्कम जाहीर केली नाही. फक्त पैसे प्राप्त झालेल्या संस्थांची यादी जाहीर केली आहे. (हेही वाचा: उत्तर कोरियामध्ये मोठे अन्नधान्य संकट; एक किलो केळी 3,336 रुपये, तर 'ब्लॅक टी'ची किंमत 5,167 रुपये)
अपोलो थिएटर ग्रुप आणि बॅलेट हिप्सनिकोसारख्या उल्लेखनीय संस्थांना स्कॉटकडून देणगी मिळाली आहे. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठ, टेक्सास युनिव्हर्सिटी आणि रेस फॉरवर्ड, बोरेलिस फिलँथ्रॉपी यासारख्या संस्थांची नावेही यात सामील आहेत.