Lockdown: Zahid F. Ebrahim यांची 99 वर्षीय Phuppi मुंबईतील स्थलांतरीत कामगारांसाठी भरतेय जेवणाचे डबे; मानवतेला प्रेरणा देणारा हृदयस्पर्षी व्हिडिओ

अशा नागरिकांना मदत करण्यासाठी काही सहृदयी लोक पुढे येत आहेत. Zahid F. Ebrahim यांची 99 वर्षीय Phuppi अशा लोकांपैकीच एक. मानवतेला प्रेरणा देणारा हृदयस्पर्षी व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात मदतीची भावना निर्माण होऊ शकेल.

Zahid F. Ebrahim's 99 year old Phuppi | (photo Credits: Twitter Video)

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिल आणि अॅटर्नी जनरल Zahid F. Ebrahim यांनी @zfebrahim या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला जेवणाचे डबे भरताना दिसत आहे. Zahid F. Ebrahim यांनी याव्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती वृद्ध महिला त्यांची आत्या (Phuppi) आहे. जी मुंबईतील स्थलांतरीत कामगरांसाठी जेवणाचे डबे भरत आहे. मानवतेला प्रेरणा देणारा हृदयस्पर्षी व्हिडिओ पाहताना मानवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक व्याप्त होण्यास मदत होते. ट्विटरवर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे देश लॉकडाऊन (Lockdown) आहे. अशा काळात स्थलांतरित कामगार (Migrant Workers) मोठ्या प्रमाणावर आपल्या मूळ गावी परतत आहेत.

कोरोना व्हायरस संकटामुळे अवघे जग चिंतेत आहे. अद्यापही या आजारावर कोणतेही औषध, उपचार अथवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल डिस्टंन्सींग हा एकमेक उपाय सध्या जगभरातील देश आवलंबत आहेत. भारतातही हाच उपाय अवलंबला जात आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सींग अधिक प्रभावीपणे पाळले जावे आणि कोरोना व्हायरसची श्रृंखला खंडीत व्हावी यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. (हेही वाचा, Pakistan Flight Crash: पाकिस्तान येथील विमान अपघात दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख)

ट्विट

दरम्यान, अवघा देश लॉकडाऊन असल्याने अनेक उद्योग, सरकारी-खासगी कार्यालयं, व्यवसाय, दुकानं सर्वच काही ठप्प आहे. त्यामुळे नागरिक आपापल्या घरांमध्ये बसून आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्यात झाला आहे.

ट्विट

ट्विट

ट्विट

घराबाहेर पडता येत नाही. नोकरीची खात्री नाही. हाताला काम नाही. त्यामुळे भकेल्या पोटी अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह घरात बसून राहिले. ज्यांना हे शक्य झाले नाही, त्यांनी स्थलांतर करत आपापल्या मूळ गावी जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थलांतर वाढले. मिळेल त्या मार्गाने अनवाणी पायांनी नागरिक आपापल्या राज्यांकडे, घरांकडे निघाले आहेत. अशा नागरिकांना मदत करण्यासाठी काही सहृदयी लोक पुढे येत आहेत. Zahid F. Ebrahim यांची 99 वर्षीय Phuppi अशा लोकांपैकीच एक. मानवतेला प्रेरणा देणारा हृदयस्पर्षी व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात मदतीची भावना निर्माण होऊ शकेल.