Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरसचा धोका सर्वात अगोदर सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
'ली वेनलियांग', असे या डॉक्टरचे नाव आहे. ली वेनलियांग यांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 हजाराहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Coronavirus Outbreak: चीनमधील (China) जीवघेण्या कोरोना विषाणूची (Coronavirus) सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 'ली वेनलियांग', (Li Wenliang) असे या डॉक्टरचे नाव आहे. ली वेनलियांग यांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 हजाराहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय डॉक्टर ली वेनलियांग तसेच इतर 8 जणांनी सर्वात अगोदर चीनला कोरोना विषाणूचा धोका असल्याचा इशारा दिला होता. परंतु, यातील ली वेनलियांग यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे गुरुवारी वुहान शहरामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वुहान शहराला कोरोना व्हायरसचा धोका सांगणारे ली वेनलियांग पहिले डॉक्टर होते. (हेही वाचा - कौतुकास्पद ! ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाने शोधली कोरोना व्हायरसवरील लस; प्राथमिक चाचणी यशस्वी)
ली वेनलियांग हे वुहान सेंट्रल रूग्णालयात कार्यरत होते. ली यांनी 30 डिसेंबर रोजी काही डॉक्टरांशी कोरोना व्हायरससंदर्भात चर्चा केली होती. परंतु, ली यांना पोलिसांनी नोटीस जारी करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा आरोप केला होता. चीनमध्ये आतापर्यंत 30 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.