Kim Jong Un Disappear: किम जोंग उन गायब; प्रकृतीबाबत पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा

उत्तर कोरियाची राजधनी प्योंगयांग (Pyongyang ) येथे एक सामूहीक परेड आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी किम जोंग उन (Kim Jong Un)प्रदीर्घ काळापासून गायब आहे.

Kim Jong Un | (PC - ANI)

उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशाहा किम जोंग उन गायब (Kim Jong Un's Disappearance) झाल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधान आले आहे. उत्तर कोरियाची राजधनी प्योंगयांग (Pyongyang ) येथे एक सामूहीक परेड आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी किम जोंग उन (Kim Jong Un)प्रदीर्घ काळापासून गायब आहे. सार्वजनिक ठिकाणी त्याचे दर्शन झाले नाही. त्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने फॉक्स न्यूजच्या हवाल्याने दिले आहे. किम जोंग पाठिमागील एक महिन्यापासून किम जोंग गायब असल्याचे बोलले जात आहे.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दक्षिण कोरियन-आधारित आउटलेट एनके न्यूजचा हवाला देत म्हटले आहे की, किमने रविवारी पॉलेट ब्युरोच्या बैठकीला उपस्थित राहणेही टाळले. आजवरच्या इतिहासात किम केवळ दोन वेळाच या बैठकीला अनुसस्थित राहिला आहे. कालची गैरहजेरी ही अनुपस्थितीची तिसरी वेळ आहे. सन 2014 मध्ये तो पहिल्यादा प्रदीर्घ काळासाठी किम जोग गायब होता. त्यानंतर मात्र त्याचे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले होते. (हेही वाचा, Kim Jong-un यांचा नागरिकांना त्यांची नावे बदलण्याचा आदेश; आता North Korea मध्ये मुलांची नावे असतील Bomb, Gun आणि Satellite)

कोरियन पीपल्स आर्मीचा 75 वा स्थापना वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यासाठी प्योंगयांगमध्ये सामूहिक परेड मंगळवार किंवा बुधवारी आयोजित केली जाणार आहे. किम परेडमध्ये हजेरी लावणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, किम त्याच्या वाढत्या अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमातील नवीनतम तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी परेडचा वापर करू शकतो. जे अमेरिका आणि आशियातील त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी देखील चिंताजनक आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासह संयुक्त सराव वाढविण्याच्या आणि या प्रदेशात बॉम्बर आणि विमानवाहू जहाजे यासारख्या अधिक प्रगत लष्करी बळ तैनात करण्याच्या अमेरिकेच्या योजनांचा निषेध केला. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात जबरदस्त आण्विक शक्तीने अमेरिकेच्या लष्करी हालचालींचा सामना करण्याचा इशारा दिला आहे.