Kim Jong Un यांच्यासारखी नागरिकांनी नक्कल करु म्हणून नॉर्थ कोरियात Leather Coat वर बंदी
अशातच आता येथील लोकांनी लेदर कोट घालण्यावर बंदी घातली आहे.
'तानाशाह' म्हणून ओळख असणाऱ्या किम जोंग उन (Kim Jong-un) याचा देश नॉर्थ कोरियात (North Korea) नागरिकांसाठी विचित्र नियम लागू करण्यात येतात. अशातच आता येथील लोकांनी लेदर कोट घालण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता या देशात लेदर कोट्स विक्री किंवा कोणाला ही घालता येणार नाही आहे.(David Hole Rock: ऑस्ट्रेलियातील व्यक्तीस मिळाली अशी वस्तू, जी आहे अब्जावधी वर्षांपूर्वीची)
डेली मेल मध्ये छापण्यात आलेल्या एका वृत्तानुसार, हा दावा करण्यात आला नॉर्थ कोरियात लेदर कोटचा ट्रेंड हा किम जोंग उन यांच्यामुळे सुरु झाला होता. कारण अशा प्रकारचा कोट फक्त तेच घालत होता. त्यांच्या आवडीचे ते परिधान आहे. 2019 मध्ये त्यांनी एका कार्यक्रमात लेदरचा काळ्या रंगाचा ट्रेंच कोट घातला होता. या कार्यक्रमाचे फुटेज सुद्धा नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवण्यात आले होते.
किम यांच्या या कोटची स्टाइल पाहून सर्वांना ते आवडले. त्यानंतर नॉर्थ कोरियात चीन येथून मोठ्या प्रमाणात लेदर कोट्स आयात करण्यात आले. लोकांनी सुद्धा त्या प्रकारचे कोट्स घालणे पसंद येत होते आणि त्याची आवड सुद्धा त्यांना वाटत होती. याच दरम्यान आता त्यांनी नागरिकांनी लेदर कोट्स घालण्यास बंदी घातली आहे. डेली रिपोर्ट्सनुसार, अशा प्रकारचे कोट्स घालणे म्हणजे त्यांची नक्कल करण्यासारखे आहे. त्याचसोबत त्यांचा अपमान होण्यासमान आहे. याच कारणामुळे सामान्य नागरिकांना लेदर कोट्स घालता येणार नाहीत.(Cannibal: मानवी मांस खाण्याची आवड; 23 वर्षीय नरभक्षक तरुणाला अटक, जीभ भाजून खाल्ली)
तर एका नागरिकाने म्हटले की, लेदर ट्रेंच कोट फक्त किम यांनी नव्हे तर त्यांच्या बहिणीने सुद्धा घातला होता. या व्यतिरिक्त नॉर्थ कोरियातील काही पॉवरफुल लोक सुद्धा अशा प्रकारचे कोट्स घालतात. त्यामुळे देशातील शक्तीशाली लोकांची ओळख पटावी हे त्यामागील कारण आहे.
दरम्यान, मार्केटप्लेसवर विविध प्रकारचे सिंथेटिक लेदर कोट्स मिळतात. ते पाहून हा नियम तयार करण्यात आला आहे. खरंतर सरकारच्या या निर्णयामुळे तरुण वर्ग नाराज आहे. कारण त्यांना ट्रेंन्ड नुसार अशा प्रकारचे लेदर ट्रेंच कोट खुप आवडायला लागले होते.