Donald Trump कडून भारतीय वंशाच्या Kash Patel यांची नव्या FBI Director पदी निवड
ट्रम्प यांच्या 2016 च्या अध्यक्षीय मोहिमेच्या एफबीआयच्या तपासात पक्षपाताचा आरोप करणाऱ्या वादग्रस्त GOP मेमोचा मसुदा तयार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी इंडो अमेरिकन कश्यप पटेल म्हणजेच काश पटेल यांची निवड पुढील Federal Bureau of Investigation चे संचालक म्हणून केली आहे. काश पटेल यांचा उल्लेख त्यांनी “America First fighter" असा केला आहे. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांपैकी एक आहे. जानेवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारीची सुरूवात होणार आहे. त्यांनी आता त्यांच्या 'ट्रम्प सरकार' मध्ये काश पटेल यांच्या द्वारा अजून एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश झालाअ आहे. यापूर्वी भारताशी जोडलेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये Vivek Ramaswamy आणि Tulsi Gabbard यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
ट्रम्प काश पटेल बद्दल काय म्हणाले?
ट्रम्प यांनी काश पटेल यांचं कौतुक केले आहे. त्यांचा उल्लेख “America First fighter" असा केला आहे. ते अमेरिकेच्या सीमा ओलांडून वाढती मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवणार असल्याचे सांगितले आहे. काश पटेल आता पुढील Director of the Federal Bureau of Investigation असतील असे ते म्हणाले आहेत. हे FBI अमेरिकेतील वाढत्या गुन्हेगारीचा शेवट करेल, स्थलांतरित गुन्हेगारी टोळ्यांना संपवेल आणि सीमेपलीकडून होणारी मानवी आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवेल. एफबीआयमध्ये निष्ठा, शौर्य आणि सचोटी परत आणण्यासाठी काश पटेल आमच्या अॅटर्नी जर्नल सोबत काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
कोण आहेत काश पटेल?
कश्यप/ काश पटेल हे 44 वर्षी भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. त्यांचे आई वडील भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. काश पटेल यांनी विधी आणि नॅशनल सिक्युरिटी मध्ये शिक्षण घेतले आहे. राज्यातल्या आणि फेडरल कोर्टात त्यांनी public defender,म्हणून कामाला सुरूवात केली. त्यांनी मर्डर पासून आर्थिक गुन्हे अशा विविध खटल्यांमध्ये वकीली केली आहे.
काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये एका गुजराती स्थलांतरित कुटुंबात झाला जो 1980 मध्ये पूर्व आफ्रिकेतून क्वीन्स, न्यूयॉर्क येथे स्थलांतरित झाला. त्यांचे कुटुंब मूळचे भारतात गुजरात मधील वडोदरा येथील आहे. मात्र, दोन्ही आई-वडील युगांडामध्ये राहत होते.