Jeff Bezos आज Amazon च्या CEO पदावरून होणार पायउतार

दरम्यान फेब्रुवारी महिन्यात बेजोस यांनी सीईओ पदावरून आपण पायउतार होणार असल्याची माहिती दिली होती.

जेफ बेझोस (Photo Credits: toopanda)

अमेझॉन (Amazon) चे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) आज (5 जुलै) कंपनीच्या सीईओ पदावरून पायाउतार होणार आहेत. त्यांच्या जागी आता एंडी जेसी यांची सीईओ म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. आजच्या दिवशी 27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1994 साली अमेझॉन कंपनीची सुरूवात झाली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात बेजोस यांनी सीईओ पदावरून आपण पायउतार होणार असल्याची माहिती दिली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जेफ बेजोस जरी सीईओ पदावरून पाय उतार होणार असले तरीही कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.

बेजोस यांनी आपली प्रतिक्रिया देताना इतर कामांना अधिक वेळ देता यावा आणि त्यांची कंपनी ब्लू ओरिजिनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला Amazon चे सीईओ पद ते सोडत आहेत. असे ते म्हणाले होते. बेझोस सध्या स्पेस फ्लाइट (Space Flight) मिशनवर काम करत आहेत. ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) मधून अंतराळात प्रवास करण्याच्या तयारी मध्ये आहेत. आज अमेझॉन या आघाडीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यामातून देशा-परदेशात 13 लाख कर्मचारी काम करत आहेत. Moon Mission For Woman: जेफ बेझोस यांची कंपनी Blue Origin चंद्रावर पाठवणार पहिली महिला (Watch Video).

जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती पाहिली तर ती अंदाजे 19 अरब डॉलरच्या आसपास आहे. जेफ हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील एक आहेत. कोरोना जागतिक महामारीच्या काळातही अमेझॉनने चांगलाच नफा कमावला आहे. घरात राहून अनेकांनी ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडला त्यामुळे 2020 मध्ये त्यांच्या कमाईत 38% वाढ होऊन ती 386 बिलियन डॉलर झाली होती. एप्रिल 2020 मध्ये बेजोस यांनी एक पत्र जारी करत 'फीड अमेरिका' साठी 100 मिलियन डॉलर दिले होते. या एनजीओ द्वारा अमेरिकेत फूड बॅंक आणि फूड पेंट्री चालवली जाते.