Nobel Prize 2018 : जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो यांना कॅन्सरच्या संशोधनाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना विभागून 2018 सालचा हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो (Photo credits: Nobel Prize Twitter)

मानाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा व्हायला आजपासून सुरुवात झाली. आज यावर्षीचे शरीरविज्ञानशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. जेम्स पी अॅलिसन आणि तासुकू होंजो या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना विभागून 2018 सालचा हा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. कॅन्सरसारख्या महत्वाच्या आजारासंबंधी या शास्त्रज्ञांनी संशोधन केले होते. कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या वैद्यकीय उपचाराच्या संशोधनाबद्दल त्यांना यावर्षीच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्काराच्या घोषणेनंतर आता रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र यासोबतच जागतिक शांततेच्या पुरस्काराबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.

यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या निवड समितीने घेतला आहे. गेल्या 70 वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो (यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही). स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी 1901 या वर्षापासून हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif