COVID 19 Vaccination in Israel: इस्त्राईल मध्ये PM Benjamin Netanyahu यांना पहिली कोविड 19 लस देत देशभरात लसीकरणाला सुरूवात
इस्त्राईल मध्ये पहिली कोविड 19 लस ही राष्ट्राचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांना देऊन य्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे.
जगात अमेरिका,ब्रिटन, रशिया, चीन, युएई सह आता इस्त्राईल (Israel) मध्ये कोविड 19 ला रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शनिवार (19 डिसेंबर) पासून त्याला सुरूवात झाली आहे. इस्त्राईल मध्ये पहिली कोविड 19 लस ही राष्ट्राचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांना देऊन य्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे.
मागील आठवड्यातच फायझरची लस इस्त्राईल मध्ये येण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान फायझरच्या बरोबरीने इस्त्राईलने मॉर्डना आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे डोस देखील मागितले आहे. दरम्यान या वर्षअखेरीपर्यंत इस्त्राईल मध्ये 20% लोकसंख्येला लस टोचण्याची सोय करण्यात आली आहे. त्याला पुरेसे डोस मागवण्यात आले आहेत. Moderna Covid-19 Vaccine Update: अमेरिकेत FDA कडून 'मॉर्डना' लसीच्या तातडीच्या वापराला मंजुरी.
दरम्यान सर्वसामान्यांच्या मनातील लसीकरणाबद्दलच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी नेत्यानाहू यांनी स्वतःला देशातील पहिली लस टोचून घेतल्याचं सांगितलं आहे.
इस्राईलची लोकसंख्या 9 मिलियन आहे. त्यापैकी कोरोनाबाधित लोकांचा आकडा 372,401 आहे. तर 3,070 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इस्त्राईल मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दोनदा नॅशनल लॉकडाऊन झाला आहे. तर नेत्यानाहू स्वतः 3 वेळेस सेल्फ आयसोलेशन मध्ये होते.