Israel-Palestine Conflict: गाझा येथे पुन्हा एकदा एअरस्ट्राइक, पहाटेच्या वेळेस इज्राइलच्या लढाऊ विमानांतून 10 मिनिटांपर्यंत बॉम्ब हल्ले
सोमवारी पहाटेच्या वेळेस इज्राइली लढाऊ विमानांनी सातत्याने 10 मिनिटांपर्यंत बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत.
Israel-Palestine Conflict: इज्राइली लढाऊ विमानांनी गाझा शहरावर पुन्हा एकदा एअरस्ट्राइक केले आहे. सोमवारी पहाटेच्या वेळेस इज्राइली लढाऊ विमानांनी सातत्याने 10 मिनिटांपर्यंत बॉम्ब हल्ले करण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इज्राइलच्या लढाऊ विमानांनी गाझा शहरातील विविध ठिकाणी एअरस्ट्राइक केले आहे. सकाळी शहराच्या उत्तर ते दक्षिण भागात 10 मिनिटांपर्यंत हल्ले केले गेले. हा एअरस्ट्राइक 24 तासांपूर्वी केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 42 फिलिस्तानी लोकांचा मृत्यू झाला आहे.
इज्राइलच्या डिफेंस फोर्सने आपल्या विधानात असे म्हटले की, IDF फायटर जेट्स गाझा पट्टीत असलेल्या दहक्षतवादी ठिकाणांना टार्गेट करत आहेत. इज्राइल आणि फिलिस्तानी यांच्या मध्ये सुरु असेलेल्या हिंसक संघर्षाच्या दरम्यान गाझा पट्टीवर इज्राइलने रविवारी पहाटे सु्द्धा बॉम्ब हल्ले केले होते. या एअरल्ट्राइकमध्ये 42 फिलिस्तानींचा मृत्यू होण्यासह बहुतांश जण जखमी सुद्धा झाले होते. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.(Israel-Palestine Conflict: इस्रायलकडून गाझावर झालेल्या आजच्या हल्ल्यात 33 जणांचा मृत्यू; Gaza मधील एकूण मृतांची संख्या 181 वर)
असे सांगितले जात आहे की, इज्राइलने नुकत्याच हमासाला मोठे नुकसान पोहचवण्यासाठी हल्ल्यांचा वेग वाढवला आहे. कारण संघर्ष संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, इज्राइल आणि फिलिस्तानी दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. ज्यामध्ये हमासा सोबत इज्राइलकडून थेट हल्ले केले जात आहेत. 2014 मध्ये झालेल्या गाझा युद्धानंतर 2021 मधील ही अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यूज एजेंसी नुसार गाझा मध्ये कमीत कमी 145 फिलिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 41 लहान मुले आणि 23 महिलांचा समावेश आहे. तर 8 इज्राइली नागरिक मारले गेले असून त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे.
तर हमासा आणि अन्य दहशतवादी समूहांनी सोमवारी इज्राइलमध्ये 2900 रॉकेट हल्ले केले आहेत. तर याला प्रतिउत्तर देत इज्राइलने हमासाला मोठे नुकसान पोहचवले आहे. आता संघर्ष सुरु असून इज्राइल कडून ही हल्ले केले जात आहेत.