Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसांचा युद्धविराम; गाझामधील मृतांची संख्या 14,800 हून अधिक

इस्रायली लष्कराने दिवसाला 300 हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात 27 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Israel-Palestine War | (PC - ANI/X)

इस्रायल आणि हमास यांच्यात 47 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध (Israel-Hamas War) आज संपुष्टात आले. शुक्रवार म्हणजेच आज इस्रायल आणि पॅलेस्टिनी इस्लामिक गट हमास यांच्यात चार दिवसांच्या युद्धविरामाची सुरुवात झाली. युद्धबंदीवर अमेरिकेसह संपूर्ण जगाने आनंद व्यक्त केला. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामात कतारने मध्यस्थी केली आहे. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. गाझामधील लोक रोजच्या भाकरीसाठी तळमळत आहेत. गाझामध्ये इंधनाच्या कमतरतेमुळे वीज नाही. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना टॉर्चच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार करावे लागले आहेत.

इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये 14,854 लोकांचा मृत्यू झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्यापैकी 5850 मुले आहेत. गाझामध्ये हवाई हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर आता जमिनीवर कारवाई करत आहे. मात्र, इस्रायल आणि गाझा यांच्यात युद्धबंदीबाबत करार झाला असून, स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेला हा युद्धविराम चार दिवस चालेल. पहिल्याच दिवशी 13 इस्रायली ओलीसांची सुटका करण्यात येणार आहे.

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील करारानुसार, गाझामधून 13 ओलिसांची शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) दुपारी 4 वाजता सुटका केली जाणार होती. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या ओलिसांची सुटका केली जाईल त्यांच्या नावांची यादी इस्रायलच्या गुप्तचर संस्थांना देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की गाझामधील युद्धबंदीच्या अंमलबजावणी योजनेवर चर्चा करण्यासाठी व्यापक बैठका घेण्यात आल्या.

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, कतारी आणि इजिप्शियन मध्यस्थ आणि दोन्ही बाजूंच्या सहभागासह युद्धविराम योजनेवर चर्चा करण्यासाठी दोहामध्ये व्यापक बैठका आयोजित करण्यात आल्या. इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी इस्रायल आणि हमास यांच्यातील कतारच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामाला मान्यता दिल्यानंतर सोडण्यात येणार्‍या ओलीसांची पहिली यादी मिळाल्याची पुष्टी केली. इस्रायलच्या लष्करी आकडेवारीनुसार, हमासने गाझामध्ये 239 लोकांना ओलीस ठेवले आहे, ज्यात 26 देशांतील परदेशी नागरिकांचा समावेश आहे. (हेही वाचा: India-Afghanistan: भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास कायमचा बंद; काय आहे यामागील नेमकं कारण? जाणून घ्या)

युद्धबंदीच्या एक दिवस आधी इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक केली. इस्रायली लष्कराने दिवसाला 300 हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी इस्रायली लष्कराने हमास कमांडर अमर अबू जलालाला ठार केल्याचा दावा केला आहे. उत्तर गाझामधील वाहतूक आणि दळणवळण खंडित झाल्यानंतर मंत्रालयाने 11 नोव्हेंबर रोजी आकडेवारी जाहीर करणे थांबवले. दक्षिण आणि उत्तरेकडील रुग्णालयांच्या 11 नोव्हेंबरच्या डेटावर नवीनतम आकडेवारी आधारित आहे. वास्तविक मृतांची संख्या जास्त असू शकते. येथे 6,000 इतर लोक बेपत्ता असून ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif