Israel Attack On Gaza Fertility Clinic: इस्रायलने गाझाच्या IVF केंद्रावर केला होता हल्ला; 5 हजार जीवांचा मृत्यू, जाणून घ्या सविस्तर

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे भ्रूण शेकडो पॅलेस्टिनी जोडप्यांसाठी शेवटची आशा होते जे मुले होण्याच्या अक्षमतेशी झुंज देत आहेत. बहालिद्दीन गल्यानी यांनी 1997 मध्ये या क्लिनिकची स्थापना केली होती.

Pregnant Women प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Israel Attack On Gaza Fertility Clinic: गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israel-Gaza War) सुरू झाले. त्यानंतर डिसेंबरमध्ये इस्रायलने गाझामधील सर्वात मोठ्या फर्टिलिटी क्लिनिकवर (IVF Centre) हल्ला केल्याची बातमी आली. आता या हल्ल्यामुळे क्लिनिकमध्ये असलेल्या 5 लिक्विड नायट्रोजन टाक्यांचे झाकण नष्ट झाल्याचे समोर आले आहे. हे द्रव नायट्रोजन बाहेर पडल्याने टाक्यांमधील तापमान वाढले होते. यामुळे 4 हजारांहून अधिक भ्रूण आणि एक हजारहून अधिक शुक्राणूंचे नमुने नष्ट झाले.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे भ्रूण शेकडो पॅलेस्टिनी जोडप्यांसाठी शेवटची आशा होते जे मुले होण्याच्या अक्षमतेशी झुंज देत आहेत. बहालिद्दीन गल्यानी यांनी 1997 मध्ये या क्लिनिकची स्थापना केली होती.

गल्यानी म्हणाले की, यापुढे मुले जन्माला घालण्याची क्षमता नसलेल्या किमान निम्म्या पालकांना मुले होण्याची दुसरी संधी मिळणार नाही. गाझामध्ये गरिबी असूनही जोडपी आयव्हीएफ प्रक्रियेसाठी पुढे येत आहेत. यासाठी ते त्यांच्या घरातील वस्तूही विकत आहेत. गाझामधील किमान 9 दवाखाने आयव्हीएफ प्रक्रिया करतात. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला पूर्णपणे नष्ट करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले सुरू केले. (हेही वाचा: Volcano Eruption Video: इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल, 828 नागरिक स्थलांतरीत)

रॉयटर्सने आयव्हीएफ केंद्रावरील हल्ल्यासंदर्भात इस्रायली लष्कराकडून प्रतिक्रिया मागितली होती, ज्यामध्ये ते म्हणाले की ते या अहवालाची चौकशी करत आहेत. इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांनी अशा कोणत्याही केंद्रांना लक्ष्य केले नाही. मात्र हमासच्या सैनिकांनी वैद्यकीय केंद्रांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी अनेक अशा केंद्रांवर हल्ले झाले होते. याआधी 7 डिसेंबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला आणि त्यामध्ये 1,200 हून अधिक लोक मारले गेले. त्याला प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 33,000 पॅलेस्टिनी मारले गेले. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 33 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू; श्रीनगरमध्ये मदत कक्ष सुरू, कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जारी

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला; घरी परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागितली मदत (Video)

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंचा राग अनावर; चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

Pahalgam Terrorist Attack: 'आम्हाला दोष देऊ नका, आमच्या देशाचा याच्याशी संबंध नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे भारताबाबत विवादित वक्तव्य (Video)

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement