ISIS चा पुढारी Abu Bakr al-Baghdadi अमेरिकन कारवाईत ठार; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती (Watch Video)

'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात ISIS या दहशतवादी संघटनेचा पुढारी अबू बक्र अल-बगदादी (Abu Bakr al-Baghdadi ) याला अमेरिकेने ठार मारले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतीच याबाबतच्या वृत्ताची पुष्टी केली आहे.

Abu Bakr al-Baghdadi (Photo Credits-Twitter)

'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात ISIS या दहशतवादी संघटनेचा पुढारी अबू बक्र अल-बगदादी (Abu Bakr al-Baghdadi ) याला अमेरिकेने  ठार मारले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतीच याबाबतच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्त संस्था राऊटर्सने दिलेल्या माहितीचा दाखला देत बगदादीला ठार केल्याची माहिती समोर येत होती. मात्र काही वेळापूर्वी पर्यंत याबाबत अमेरिका किंवा ट्रम्प यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती तर दुसरीकडे ट्रम्प यांनी ट्विटर वर Something very big has just happened! अशा शब्दात पोस्ट लिहून अप्रत्यक्ष इशारा दिला होता.

यापूर्वी अनेकदा अशाच प्रकारे बगदादी याच्या मृत्यूची वृत्ते समोर आली होती मात्र त्याला कोणीच दुजोरा दिला नव्हता मात्र यावेळेस स्वतः ट्रम्प यांनी ही माहिती दिल्याने जगातील मोठ्या दहशवादी संस्थेच्या म्होरक्याचा खात्मा झाला हे निश्चित आहे. सीरीयाने काही दिवसांपूर्वी त्यांचं सैन्य हटवल्यानंतर आता अमेरिकी सैन्याने ही कारवाई केली असल्याचं समजत आहे. हवाई हल्ल्याच्या मध्यमातून ही कारवाई केली असल्याचेही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प ट्विट

प्राप्त माहितीनुसार, बगदादी हा आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. तो इराक आणि सिरियामध्ये राहतो. मात्र, तो नेमका कुठे राहतो याबाबत माहिती मिळाली नाही. बगदाद शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. सुरुवातीपासूनच तो कट्टर विचारसरणीचा होता. इतकंच नाही तर त्यानं स्वतःच्या कुटुंबीयांसाठीही कठोर नियम करून त्यांचे पालन न झाल्यास कुटुंबातील सदस्यांनाही त्यांनी शिक्षा सुनावली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now