डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराच्या कुत्र्याचे केले कौतुक; ISIS म्होरक्या बगदादी याचा खात्मा केल्याबद्दल म्हणाले 'ग्रेट जॉब'

हा पिच्छा करताना एक कुत्रा गंभीर जखमी झाला होता. हा कुत्रा आता पुन्हा एकदा तंदुरुस्त होऊन अमेरिकी लष्करी सेवेत दाखल झाला आहे.

Dog | (Photo Credit: Twitter)

ISIS म्होरक्या बगदादी याचा खात्मा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराच्या कुत्र्याचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार सोमवारी) रात्री उशीरा एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ग्रेट जॉब, आतापर्यंत या कुत्र्याचे नामकरण करण्यात आले नाही. या आधी या कुत्र्याला जेनरल म्हणून संबोधण्यात आले होते. मात्र, आता आम्ही त्याचे नाव जाहीर करत नाही.

आयसीस (ISIS) म्होरक्या अबू अल बगदादी याचा अमेरिकी लष्कराच्या कुत्र्यांनी पिच्छा पुरवला होता. हा पिच्छा करताना एक कुत्रा गंभीर जखमी झाला होता. हा कुत्रा आता पुन्हा एकदा तंदुरुस्त होऊन अमेरिकी लष्करी सेवेत दाखल झाला आहे. हा कुत्रा सोमवारीच कर्तव्यावर हजर झाला. अमेरिकी ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन जनरल मार्क मिले यांनी ही माहिती दिली आहे. या कुत्र्याच्या मदतीमुळेच अमेरिकी लष्कराला बगदादीचा खात्मा करण्यास मोठे यश मिळाले. (हेही वाचा, ISIS चा पुढारी Abu Bakr al-Baghdadi अमेरिकन कारवाईत ठार; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती (Watch Video))

डोनाल्ड ट्रम्प ट्विट

जनरल मार्क मिले यांनी म्हटले आहे की, या कुत्र्याने सीरियामधील अमेरिकी लष्कराच्या विशेष हल्ल्यावेळी जबरदस्त भूमिका निभावली. ज्यामुळे आयएआयएस म्होरक्याचा खात्मा झाला. बगदादीचा खात्मा झाल्याची घोषणा करताना अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, उत्तर सीरियातील एका अंधाऱ्या भुयारात आयएआयएस म्होरक्या अमेरिकी लष्करांच्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. बगदादी याने शनिवारी सायंकाळी सीरिया येथील इदलिब प्रांतातील एका भुयारात बॉम्बने स्वत:ला उडवून दिले. अमेरिकी लष्कर कारवाई करत असताना त्याने स्वत:ला उडवून दिले. बगदादी हा आपल्या अत्यंत जवळच्या लोकांसोबत या भुयारात लबला होता.