Iran Opens Airspace for Delhi Flight: भारतीय विद्यार्थ्यांसाठी इराणने उघडले हवाई क्षेत्र; 1 हजार विद्यार्थी घरी परतणार

इराणने आपले हवाई क्षेत्र फक्त भारतासाठी उघडण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, किमान 1000 भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Iran Opens Airspace for Delhi Flight: भारतीय विद्यार्थ्यांसाठी इराणने उघडले हवाई क्षेत्र; 1 हजार विद्यार्थी घरी परतणार
1,000 Indian students to land in Delhi tonight (फोटो सौजन्य -X/@nabilajamal_)

Iran Opens Airspace for Delhi Flight: सध्या इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू असून इराणमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी अत्यत महत्त्वाची बातमी आहे. कारण, भारताने पुन्हा एकदा परदेशात आपल्या राजनैतिकतेची जादू दाखवली आहे. इस्रायल-इराण युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले आहेत. तथापि, इराणने आपले हवाई क्षेत्र फक्त भारतासाठी उघडण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, किमान 1000 भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतिबिंब मानले जात आहे.

तेहरानहून दिल्लीला परतणार 1 हजार भारतीय विद्यार्थी -

प्राप्त माहितीनुसार, आज रात्री इराणमध्ये अडकलेले 1 हजार विद्यार्थी दिल्लीला परततील. इराणच्या या पावलामुळे तेहरानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची परतीची खात्री झाली आहे. यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. पहिली विमान आज रात्री 11 वाजता दिल्लीला पोहोचेल. दुसरे आणि तिसरे विमान शनिवारी पोहोचेल. यापैकी एक विमान सकाळी नवी दिल्लीला पोहोचेल. तर दुसरे विमान संध्याकाळी पोहोचेल. (हेही वाचा - Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात बिअरशेवा येथील सोरोका रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; आयडीएफचा दावा)

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2015 च्या सुरुवातीला, इराणमध्ये सुमारे 10 हजार भारतीय नागरिक होते, ज्यात 6 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत, परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, एकूण 10320 भारतीय नागरिक इराणमध्ये होते, ज्यात 445 इतर भारतीय वंशाचे लोक होते. सध्याच्या युद्ध परिस्थितीत, सुमारे 6 हजार भारतीय विद्यार्थी इराणमध्ये आहेत. तर उर्वरित इतर नागरिक आहेत.

इराण-इस्रायल संघर्ष -

इराण-इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. युद्धाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय मायदेशात परतत आहेत. 13जून रोजी, इस्रायलने लढाऊ विमानांनी इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल, इराणने आतापर्यंत 400 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून इस्रायलवर प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, भारताने इस्रायलमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन 'अजय' आणि इराणमधून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ऑपरेशन 'सिंधू' सुरू केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2784 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).