Iran: रामहोर्मोझमध्ये अंत्यसंस्कारासाठी पालकांनी मुलीला कारमध्ये सोडल्यानंतर 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, धक्कादायक कारण आले समोर
इराणच्या रामहोर्मोझ एका 4 वर्षाच्या मुलीचा कारमध्ये मूत्यू झाला, पाहा काय आहे नेमके कारण
Ramhormoz, June 24: इराणच्या रामहोर्मोझ एका 4 वर्षाच्या मुलीचा कारमध्ये मूत्यू झाला आहे. काही तास, तीव्र तापमानात पालकांनी मुलीला कारमधेच ठेवले होते. पालक मुलीला कारमध्ये सोडून अंत्यसंस्कारासाठी गेले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीला कारमध्ये बंद केले होते आणि उष्माघात आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाला. सादिया नावाची मुलगी तिच्या मावशीच्या अंत्यसंस्कारासाठी तिच्या आई-वडिलांसोबत रामहोर्मोझ येथे गेली होती. लांबच्या प्रवासामुळे मुलगी थकलेली होती आणि गाडीत झोपली होती . तिच्या पालकांनी तिला उठवले नाही आणि पालक अंत्यसंस्कारात गेले होते. मात्र, अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या दु:खामुळे पालकांना मुलीचा विसर पडला. एका स्थानिक अहवालात असे म्हटले आहे की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रामहोर्मोजमधील तापमान 49 अंशांपर्यंत वाढले होते, ज्यामुळे कारमधील तापमान 76 अंशांपर्यंत वाढले होते. शोकग्रस्त जोडप्याचे आता समुपदेशन होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)