Indonesia Flood Updates: इंडोनेशियामध्ये महापूर, 50 मृत, 27 बेपत्ता; मदत आणि बचाव कार्य सुरु
सुमारे 3,000 हून अधिक लोकांना दलदलीतून बाहेर काढून सुरक्षीत स्थळी हालविण्यात आले आहे.
इंडोनेशियाच्या (Indonesia) पश्चिम सुमात्रा प्रांतात अचानक आलेल्या पूर (West Sumatra Flash Floods) आणि चिखलामुळे मृतांची संख्या 52 वर पोहोचली आहे तर 27 जण बेपत्ता आहेत. सुमारे 3,000 हून अधिक लोकांना दलदलीतून बाहेर काढून सुरक्षीत स्थळी हालविण्यात आले आहे, अशी माहिती देशाच्या आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी मंगळवारी (14 मे) दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम सुमात्रा प्रांतातील तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, अचानक पूर, भूस्खलन आणि थंड लाव्हारस यांमुळे परिस्थीती कमालिची बिघडली.
थंड लाव्हारसाची स्थानिक भाषेत लाहार अशी ओळख
इंडोनेशिायातील सुमात्रा प्रांतावर मोठ्या प्रमाणावर आपत्ती आल्याची माहिती शनिवारी सायंकाळी तीव्रतेने जाणवले. त्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये या घटनेत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मंगळवारी सकाळी हाती आलेल्या अद्ययावत माहितीनुसार मृतांची संख्या सध्या 50 पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. थंड लाव्हारस , स्थानिक भाषेत लाहार म्हणून ओळखला जातो. सुमात्राच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक असलेल्या मारापी पर्वतावरून मोठ्या प्रमाणावर लाव्हा निघतो. डिसेंबरमध्ये माऊंट मारापीच्या उद्रेकात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, Earthquake in Indonesia: इंडोनेशियात ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के; समुद्रात महाकाय लाटा निर्माण)
घरे, भातशेती, रस्ते आणि इमारतींना फटका
पश्चिम सुमात्रा आपत्ती एजन्सीचे प्रवक्ते इल्हाम वहाब यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52 मृतांपैकी 45 जणांची ओळख पटली आहे. अद्याप बेपत्ता असलेल्या 17 लोकांसाठी स्थानिक बचावकर्ते, पोलिस आणि लष्करी कर्मचारी यांचा समावेश असलेली शोध मोहीम सुरू आहे. इल्हाम यांनी माहिती देताना सांगितले की, 249 घरे, 225 हेक्टर (556 एकर) जमीन, भातशेतीसह, आणि प्रभावित जिल्ह्यांतील प्रमुख रस्ते नष्ट झाल्याची नोंद आहे. रविवारपासून पुराचे पाणी ओसरले असले तरी आता लक्ष रस्ता साफसफाई आणि जनजीवन पुर्वपदावण आणणने आणि झालेली हानी भरुन काढणे हे असेल. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याव्यतिरिक्त, आमचे प्राधान्य मुख्य रस्ते चिखल, ढिगारा आणि पुरामुळे साचलेले मोठे खडक साफ करणे हे देखील असल्याचे, इल्हाम यांनी सांगितले. (हेही वाचा, Indonesia Landslide : इंडोनेशियात पावसाचा कहर! भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू, अफगाणिस्तानमध्ये आकडा ३३ वर)
इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सी बीएनपीबीचे प्रमुख सुहार्यंटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3,396 लोकांना मंगळवारपर्यंत जवळच्या आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तंबू, ब्लँकेट्स, अन्न, स्वच्छता किट, पोर्टेबल टॉयलेट आणि वॉटर प्युरिफायर यासह मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, चिखल आणि ढिगाऱ्यांनी व्यापलेल्या अडथळ्यांच्या रस्त्यांमुळे वाहतुकीची आव्हाने कायम आहेत. दरम्यान, इंडोनेशियामध्ये ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.