Afghanistan-Taliban Conflict: अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तालिबानांकडून धोका नाही, तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीन यांचे स्पष्टीकरण

तालिबानने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

Taliban (Photo Credits: Getty Images)

अफगाणिस्तान सैन्य (Afghanistan Army) आणि तालिबान (Taliban) यांच्यातील परिस्थिती पूर्वी अनेक प्रमुख शहरांवर ताबा घेतल्याने बिघडत चालली आहे. भारताला देशात व्यापक आणि त्वरित युद्धबंदीची अपेक्षा आहे. भारताने (India) तेथे उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेवर तसेच अफगाणिस्तानमधील भारताच्या प्रकल्पांच्या भवितव्याबद्दल पुन्हा पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्रालयाचे (Foreign Ministry ) प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagh) यांनी आश्वासन दिले की भारत अफगाणिस्तानमधील सर्व पक्षांच्या संपर्कात आहे. भू-स्तरीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. दूतावासाने दिशानिर्देश जारी केले की, अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये हिंसाचार वाढला असल्याने अनेक प्रांत आणि शहरांमध्ये व्यावसायिक हवाई प्रवास सेवा बंद पडत आहेत. दरम्यान तालिबानच्या प्रवक्त्याने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी मोठे विधान केले आहे. तालिबानने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

तालिबानने आश्वासन दिले आहे की ते अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासांना लक्ष्य करणार नाही.  तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीन (Mohammad Suhail Shaheen) म्हणाले,आम्ही भारतीय मुत्सद्यांना आणि दूतावासाला आश्वासन देऊ इच्छितो की त्यांना आमच्या बाजूने धोका नाही. आम्ही दूतावासांना धमकी देणार नाही. आम्ही हे एकदा नव्हे तर अनेक वेळा आमच्या निवेदनात सांगितले आहे. हे आमचे आहे वचन जे मीडियामध्ये देखील आहे. हेही वाचा Taliban कडून Afghanistan मधील सर्वात मोठं दुसरं शहर Kandahar वर ताबा

तालिबानच्या प्रवक्त्याला विचारले तो भारताला आश्वासन देऊ शकतो का ?  यावर प्रवक्त्याने सांगितले आमचे एक सामान्य धोरण आहे की आम्ही अफगाणिस्तानवरील संघर्ष कोणत्याही शेजारी देशाविरुद्ध वापरू न देण्यास बांधील आहोत. अफगाणिस्तानमध्ये भारताच्या मदतीने सुरू असलेल्या प्रकल्पांवर तालिबान म्हणाला, अफगाण लोकांसाठी धरणे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अफगाणिस्तानच्या विकास, पुनर्बांधणी आणि आर्थिक समृद्धीसाठी जे काही केले गेले आहे. त्याची आम्ही प्रशंसा करतो.

संपूर्ण दक्षिणेकडील भागावर तालिबानने शुक्रवारी देशाच्या संपूर्ण दक्षिण भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. आणखी चार प्रांतांच्या राजधानी ताब्यात घेतल्या आणि हळूहळू काबुलच्या दिशेने वाटचाल केली आहे. अफगाणिस्तानच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर ताबा घेतल्यानंतर तालिबानने हेलमंड प्रांताची राजधानी लष्करगहावर ताबा मिळवला आहे. हेलमंडमध्ये जवळपास दोन दशकांच्या युद्धात शेकडो परदेशी सैनिक मारले गेले.

दक्षिणेकडील प्रदेश ताब्यात घेणे म्हणजे तालिबानने 34 प्रांतांपैकी निम्म्याहून अधिक राजधान्यांवर ताबा मिळवला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा अमेरिका काही आठवड्यांनंतर आपले शेवटचे सैनिक माघार घेणार आहे. तेव्हा तालिबानने देशाच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त प्रदेश ताब्यात घेतला आहे.