Indian Student Dies in New York: न्यूयॉर्कमधील धबधब्यात पाय घसरून पडल्याने भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने 7 जुलै रोजी बार्बरविले फॉल्स, अल्बानी, न्यूयॉर्क येथे गडदे यांच्या बुडण्याच्या वृत्ताची पुष्टी केली आणि शोक व्यक्त केला.

Drown | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Indian Student Dies in New York: ट्राइन विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थीचा न्यूयॉर्क (New York)च्या बार्बरविल फॉल्स येथे गिर्यारोहण करताना पाय घसरल्याने धबधब्यात बुडून मृत्यू झाला. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने या विद्यार्थ्याची ओळख साई सूर्य अविनाश गडदे (Surya Avinash Gadde) अशी केली आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने 7 जुलै रोजी बार्बरविले फॉल्स, अल्बानी, न्यूयॉर्क येथे गडदे यांच्या बुडण्याच्या वृत्ताची पुष्टी केली आणि शोक व्यक्त केला.

गडदे हा आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील रहिवाशी होता. तो 2023 मध्ये यूएसला गेला होता. न्यू यॉर्कमधील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने या घटनेची माहिती देताना X वर पोस्ट करत लिहिलं आहे की, 'ट्राइन युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी साई सूर्य अविनाश गडदे हा 7 जुलै रोजी बार्बरविले फॉल्स, अल्बानी, NY येथे बुडून मरण पावला. याचे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही त्यांच्या दुःखी कुटुंबियांना आणि मित्रांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.' (हेही वाचा -Indian-origin Woman Dies In Melbourne: मेलबर्नहून नवी दिल्लीला येणाऱ्या क्वांटास विमानात 24 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू)

अविनाशचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी भारतीय वाणिज्य दूतावास आवश्यक मदत करत आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावास अविनाश गडदे यांच्या पार्थिवाच्या भारतात नेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) जारी करण्यासह सर्व आवश्यक मदत करत आहे. या कठीण काळात आमचे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, असंही न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटलं आहे. (हेही वाचा - Badminton Player Dies on Court: सामना खेळताना कोर्टवर कोसळला, 17 वर्षीय चिनी बॅडमिंटनपटूचा मृत्यू; PV Sindhu कडून दु:ख व्यक्त)

मे महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एका बाईक अपघातात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. बेलेम अच्युथ असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. तो स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचा विद्यार्थी होता. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना शोक व्यक्त केला होता.