Indian-Origin Student Frozen to Death: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा यूएसमध्ये थंडीने गोठून मृत्यू, क्लबमध्ये नाकारला होता प्रवेश

अकूल धवन (Akul Dhawan) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो इलिनॉय विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

क्लबमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे बाहेर राहिलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा थंडीने गोठून मृत्यू (Indian-Origin Student Frozen to Death) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अकूल धवन (Akul Dhawan) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो इलिनॉय विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. वयवर्षे अवघे 18 असलेला अकुल त्याच्या मित्रांसोबत नाईटआऊटवर होता. अतिप्रमाणात मद्यपाण आणि अतिशीत तापमानात दिर्घकाळ राहिल्याने त्याचा हायपोथर्मियामुळे मृत्यू झाला, असेसांगम्यात येत आहे. त्याच्या मृत्यूनंतर एका महिन्यानंतर इलिनॉयमधील चॅम्पेन काउंटी कॉरोनर कार्यालयाने सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पालकांनी इलिनॉय विद्यापीठ पोलिसांकडे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हायपोथर्मियामुळे मृत्यू

इलिनॉयमधील चॅम्पेन काउंटी कॉरोनर कार्यालयाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय वंशाचा विद्यार्थी अकुल धवन एका क्लबजवळ मृतावस्थेत आढळून आला. त्याने अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. दीर्घकाळ नशा आणि अतिशीत तापमानात राहिल्याने हायपोथर्मियाला सामोरे जावे लागले. ज्यामध्ये त्याचा मत्यू झाला. दरम्यान, त्याचा शोध घेण्यात आणि हरवलेल्या व्यक्तीची माहिती मिळविण्याबाबत असलेल्या प्रोटोकॉलमध्ये निष्कळजीपणा दाखविल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत अकुलच्या पालकांनी युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा, Indian-Origin Student Found Dead: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, यूएसमधील जंगलात सापडला मृतदेह; वर्षभरातील चौथी घटना)

पालकांकडून प्रश्नांची सरबत्ती

द न्यूज गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका खुल्या पत्रात, अकुलच्या पालकांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल उत्तरांची होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी बुसे-इव्हान्स रेसिडेन्स हॉलजवळ पोलिसांच्या शोधाच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अकूलचा शेवटचा ठावठिकाणा असलेल्या म्हणजेच त्याला शेवटचे पाहिले गेले होते तेथे विद्यापीठ अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून काय कारवाई झाली याबाबतही माहिती पुढे येणे आवश्यक असल्याचे पोलीसांनी म्हटले. (हेही वाचा, Indian Student Found Dead In US: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ कॅम्पसमध्ये आढळला: रिपोर्ट)

दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-चॅम्पेनने अकुल धवनच्या मृत्यूच्या कारणांची पुष्टी केली जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रारंभिक निष्कर्ष असे सूचित करतात की, त्याच्या मृत्यपाठीमागे कोणाचाही निष्काळजीपणा किंवा चूक नाही. एका प्रेस रिलीझनुसार, धवनचा 20 जानेवारी रोजी अर्बना येथे मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याचा संपर्क तुटल्यामुळे मित्रांनी पोलिसांशी केलेल्या संपर्कात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Indian Student Found Dead In Ohio: ओहायोमध्ये आढळला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह,चौकशी सुरु; आठवड्याभरातून तिसरी घटना

दरम्यान, यूएसमध्ये शिक्षण अथवा इतर कारणांसाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण पाठिमागील काही काळापासून वाढले आहे. ज्यामुळे विविध पातळ्यांवरुन चिंता व्यक्त केली जात आहे. युनायटेड स्टेट्समध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याच्या प्रशासनाच्या वचनबद्धतेवर भर देत व्हाईट हाऊसने जोर दिला आहे.