Racial Online Posts: भारतीय वंशाचा Rapper Subhas Nair यास सिंगापूरमध्ये तुरुंगवासाची शिक्षा
सिंगापूर येथील भारतीय वंशाचा रॅपर सुभाष नायर (Rapper Subhas Nair) याला सोशल मीडियावर केलेल्या वांशिक आणि दोन समूहांमध्ये तेड निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल अशी पोस्ट ऑनलाईन केलेबद्दल सहा आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सिंगापूर येथील भारतीय वंशाचा रॅपर सुभाष नायर (Rapper Subhas Nair) याला सोशल मीडियावर केलेल्या वांशिक आणि दोन समूहांमध्ये तेड निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल अशी पोस्ट ऑनलाईन केलेबद्दल सहा आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सुभाष गोविन प्रभाकर नायर असे या गायकाचे नाव आहे. त्याने जुलै 2019 ते मार्च 2021 या काळात केलेल्या विविध पोस्टमध्ये तो 23 जुलै रोजी दोषी आढळला. त्याने धर्म आणि वंश यांची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट केल्या. ज्या त्याला कायदेशीर भाषेत अडचणीच्या ठरल्या, असे वृत्त आहे.
सिंगापूरमधील स्थानिक जिल्हा न्यायाधीश शैफुद्दीन सरूवान यांनी खटल्यादरम्यान निरिक्षण नोंदवले की, आरोपीने केलेल्या ऑनलाईन पोस्ट या अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी प्रतिबंध "सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात अधिक महत्त्वाच्या ठरतात" कारण दुष्ट हेतू असलेले वर्णद्वेषी संदेश मोठ्या प्रेक्षकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय वेगाने पोहोचू शकतात. ज्यातून धार्मिक, वांशिक अथवा जातीय तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोपी या कृत्यास जबाबदार आहे.
कोर्टाने पुढे म्हटले की, अशा संदेशांमुळे केवळ लक्ष्यित वांशिक किंवा धार्मिक गटांचेच नव्हे तर सर्वसाधारणपणे समाजाचे नुकसान होते. दरम्यान, सुभाष याचे वकील सुआंग विजया यांनी सांगितले की, तो निर्दोष आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे आपण वरच्या कोर्टाकडे शिक्षेविरोधात दाद मागणार असल्याचे आपण न्यायालयाला सांगितले आहे. नायरला दोषी ठरविण्यात आलेल्या चार आरोपांपैकी एक 29 जुलै 2019 च्या YouTube व्हिडिओशी संबंधित आहे.ज्यामध्ये तो आणि त्याची बहीण, प्रीती नायर यांनी वर्णद्वेषी गीत असलेले गाणे सादर केले.
सुभाष याला पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच सशर्थ इशारा दिला होता. परंतु त्याने पुन्हा सोशल मीडियावर टिप्पण्या पोस्ट केल्या. ज्या आक्षेपार्ह मानल्या गेल्या. त्याने समलैंगिक आणि जातीवाचक भाष्यही आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले होते.