Indian-Origin Student Found Dead: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, यूएसमधील जंगलात सापडला मृतदेह; वर्षभरातील चौथी घटना

तो देखील पर्ड्यू विद्यापीठातच शिक्षण घेत होता. यूएसमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू (Indian-Origin Found Dead) होण्याची वर्षभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे या मृत्यूंकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

भारतीय वंशाचा विद्यार्थी विद्यार्थी समीर कामथ (Sameer Kamath) याचा मृत्यू झाला आहे. तो 23 वर्षांचा होता. क्रोज ग्रोव्ह नेचर प्रिझर्व्हच्या जंगलात त्याचा मृतदेह बेवारसरित्या आढळून आला. समीर हा डॉक्टरेट होता आणि पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण (Purdue University Student Death) घेत होता. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच आणखी एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. तो देखील पर्ड्यू विद्यापीठातच शिक्षण घेत होता. यूएसमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू (Indian-Origin Found Dead) होण्याची वर्षभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे या मृत्यूंकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

समीर कामथ पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थी

समीर कामथ याने पर्ड्यू विद्यापीठ येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याता मृत्यू होण्यापूर्वी याच विद्यापीठातील संबंधीत विभागात तो पुढील शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूमूळे खळबळ उडाली असून, वॉरन काउंटी कॉरोनरचे कार्यालय आणि शेरीफच्या कार्यालयासह पोलिसांकडून त्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. क्रॉफर्ड्सविले येथे मंगळवारी दुपारी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. (हेही वाचा, Indian Student Found Dead In US: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ कॅम्पसमध्ये आढळला: रिपोर्ट)

पर्ड्यू विद्यापीठातील नील आचार्य याचाही मृत्यू

पर्ड्यू विद्यापीठात शिकणाऱ्या नील आचार्य या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा नुकताच मृत्यू झाला. तो अचानक बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर काऊंटी पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, कॅम्पसमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. संगणक विज्ञान आणि डेटा सायन्समधील दुहेरी पदवीधर असलेल्या आचार्य याचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला होता. (हेही वाचा, Indian Student Found Dead In Ohio: ओहायोमध्ये आढळला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह,चौकशी सुरु; आठवड्याभरातून तिसरी घटना)

विवेक सैनी आणि श्रेयस रेड्डी देखील पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थी

दरम्यान, विवेक सैनी हा आणखी एक भारतीय वंशाचा विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तो देखील पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत होता. जॉर्जियामध्ये पदव्युत्तर पदवी घेत असलेला हा 25 वर्षीय भारतीय विद्यार्थी कामावर असताना एका बेघर व्यक्तीच्या जीवघेण्या हल्ल्याला बळी पडला. ज्याचा व्हिडिओही पुढे आला होता. अशीच आणखी एक घटना घडली होती, ज्यामध्ये श्रेयस रेड्डी नावाच्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. हा विद्यार्थीसुद्धा ओहायो येथे मृतावस्थेत आढळला.

युनायटेड स्टेट्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे जगभरातून चिंता आणि शोक व्यक्त केला गेला आहे. ज्यामुळे परदेशात शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा उपाय आणि सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. एकाच देशातील विद्यार्थ्यांचा विशिष्ट कालावधीनंतर मृत्यू होणे ही गंभीर बाब मानली जात आहे.