पती-पत्नीचा इंटिमेट सीन फेसबुकवर लाईव्ह, महिलेकडून टिकटॉकवर अनुभव शेअर
पण त्याचवेळी अशी घटना घडली ज्यामुळे तिला शरमेने मान खाली घालावी लागली. जेव्हा महिला बेडरुममध्ये इंटिमेट मोमेंट मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होती.
आजकाल सोशल मीडियावर अनेक जण सक्रीय असतात. तर काही जण आपल्या कलेने रातोरात स्टार बनतात. वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याकडे अनेकांचा कल असतो. सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस ईतकी वाढत चालली आहे की कोट्यवधी लोकं फेसबुकचा वापर करतात. फेसबुकच्या माध्यमातून जगभरात पोहचताच. पण एका अमेरिकन महिलेच्या चुकीमुळे तिची चांगलीच पंचाईत झाली आहे. ही महिला तिच्या पतीसोबत खासगी क्षण रेकॉर्ड करत होती. पण त्याचवेळी अशी घटना घडली ज्यामुळे तिला शरमेने मान खाली घालावी लागली. जेव्हा महिला बेडरुममध्ये इंटिमेट मोमेंट मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होती. तेव्हा चुकून तिच्याकडून फेसबुक लाईव्ह(Facebook Live) सुरु झालं. त्यानंतर महिलेच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ ते बंद केले. परंतु या घटनेने नेटिझन्स हैराण झाले. महिलेने टिकटॉक व्हिडीओवर तिच्या चुकीमुळे तिला भरपुर त्रास सहन करावा लागला असा अनुभव शेअर केला.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, महिलेने तिच्या टिकटॉक व्हिडीओवर हा प्रसंग शेअर करताना सांगितले की, मला पतीसोबत इंटिमेंट मोमेंट कॅमेऱ्यात कैद करण्याची इच्छा होती. मी मोबाईलवर कॅमेरा सुरु केला. तेव्हा अचानक फेसबुक लाईव्ह सुरू झाले. माझे खासगी क्षण लाईव्ह लोकांनी पाहिले. यात माझे वडीलही होते असं महिलेने सांगितले. (हे ही वाचा मुलीच्या नावावर आईने कॉलेज मध्ये घेतला प्रवेश, विद्यार्थ्यांसोबत सुद्धा ठेवले संबंध.)
फेसबुक लाईव्ह व्हिडीओ नेमका कसा सुरू झाला हे माहिती नाही. जवळपास ४६ लोकांनी ते पाहिले. त्यात वडीलही होते. जेव्हा तिला या गोष्टीची कल्पना झाली. तेव्हा आठवडाभर तिला शरमेने मान खाली घालून राहावं लागलं होत. तिच्या खोलीत ती खूप रडत होती. सोशल मीडियावर या घटनेवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही युजर्सने म्हटलं की आम्हाला नवा धोका कळला तर काही यापुढे सतर्क राहा असं सांगितले. सध्या या महिलेचा अनुभव सांगणारा व्हिडीओ २ लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे.