Horror in Pakistan: पाकिस्तानमधील रुग्णालयाच्या छतावर आढळले 500 मृतदेह; अनेकांच्या शरीराचे अवयव गायब, तपास सुरु

हॉस्पिटलमध्ये सुमारे 500 मृतदेह सापडल्याच्या या प्रकरणात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, विद्यापीठातील विद्यार्थी वैद्यकीय प्रयोगांसाठी या मृतदेहांचा वापर करत असल्याचे निश्‍तर वैद्यकीय विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने म्हटले आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पाकिस्तानातील (Pakistan) मुलतान (Multan) शहरातील पंजाब निश्तार रुग्णालयातून (Nishtar Hospital) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या हॉस्पिटलच्या छतावर मृतदेहांचा ढीग पडलेला आढळला आहे. रुग्णालयाच्या छतावर सापडलेल्या सर्व मृतदेहांचे तुकडे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मृतदेहांमधून शरीराचे अवयवही गायब आहेत. काही मृतदेहांच्या छाती उघड्या आहेत. मृतदेहातून हृदय व इतर अवयव काढण्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये, पंजाब निश्तार हॉस्पिटलच्या छतावर सापडलेल्या या मृतदेहांची संख्या सुमारे 500 म्हटली जात आहे. हे मृतदेह कोणाचे आहेत आणि ते रुग्णालयाच्या छतावर का ठेवण्यात आले याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. मात्र, या मृतदेहांचा वापर मानवी अवयवांच्या तस्करीसाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी केला जात असावा, असे बोलले जात आहे.

हॉस्पिटलच्या टेरेसवर सापडलेल्या या मृतदेहांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हे व्हिडिओ तुमचे लक्ष विचलित करू शकतात कारण व्हिज्युअल्स खूपच भयावह आहेत. या प्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चौधरी जमान गुर्जर यांनी पंजाब निश्तर हॉस्पिटलला भेट दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतानाच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

त्याचवेळी मुख्यमंत्री चौधरी परवेझ इलाही यांनीही या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतदेह अशा प्रकारे ठेवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दक्षिण पंजाबचे अतिरिक्त मुख्य सचिव साकिब जफर यांनी विशेष आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांची टीम तयार केली असून तीन दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: Kabul Suicide Bombing: काबूलच्या वर्गातील आत्मघातकी बॉम्बस्फोटात 53 जणांचा मृत्यू; 46 मुली व महिलांचा समावेश)

हॉस्पिटलमध्ये सुमारे 500 मृतदेह सापडल्याच्या या प्रकरणात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, विद्यापीठातील विद्यार्थी वैद्यकीय प्रयोगांसाठी या मृतदेहांचा वापर करत असल्याचे निश्‍तर वैद्यकीय विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने म्हटले आहे. या सर्व मृतदेहांवर यापूर्वीही वैद्यकीय प्रयोग करण्यात आले आहेत. या मृतदेहांमधून हाडे आणि कवट्या काढून पुढील वापरासाठी छतावर ठेवण्यात आल्या आहेत.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Satta Matka Online: टेक्नोलॉजी ने कसा बदलला सट्टा मटका चा खेळ; जाणून घ्या फायदे आणि धोके

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील