H-1B Visa: 20 मार्चपासून अमेरिका हटवणार या परदेशी कामगारांचे रेकॉर्ड्स, जाणून घ्या कोणावर होणार परिणाम
मंजूर रेकॉर्ड कंट्रोल शेड्यूलची अंमलबजावणी गुरुवार, 20 मार्च 2025 पासून सुरू होईल. पात्र केस रेकॉर्ड हटवणे प्रत्येक केसच्या FLAG सिस्टीममध्ये नोंदवलेल्या final determination date वर आधारित असेल.
अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासन आल्यापासून व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता नव्या अपडेट नुसार, Foreign Labor Access Gateway या पोर्टल वरून सारी Temporary Labor Condition Applications काढून टाकली जाणार आहेत. यामाध्ये H-1B, H-1B1, H-2A, H-2B, E-3 visas आणि Permanent Labor Certification Applications चा समावेश आहे. Foreign Labor Access Gateway या पोर्टलवर अमेरिकेमधील पात्र अमेरिकन आणि परदेशी कामगारांचा डाटा साठवला जातो. मात्र आता 20 मार्च पासून तो हटवला जाणार आहे.
Department of Labor’s Employment and Training Administration, Office of Foreign Labor Certification (OFLC) ने विविध स्टेकहोल्डर्सना कळवले आहे की 20 मार्च रोजी मध्यरात्रीपासून परदेशी कामगार अर्ज Foreign Labor Application Gateway मधून रेकॉर्ड हटवले जातील.
OFLC ने मंजूर रेकॉर्ड कंट्रोल शेड्यूलच्या अंमलबजावणीबाबत सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये final determination date पासून 5 वर्षांपेक्षा जुने फॉरेन लेबर अॅक्सेस गेटवे (FLAG) मधील रेकॉर्ड हटवणे आवश्यक आहे.
जर एखाद्या अमेरिकन एम्पलॉयरकडे FLAG सिस्टीममध्ये अंतिम निर्णयाच्या तारखेपासून पाच वर्षांपेक्षा जुन्या केसेस असतील, तर त्यांना त्या केसेस 19 मार्च 2025 पर्यंत डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Self-Deportation म्हणजे काय? H-4 Visa वर अल्पवयीन म्हणून अमेरिकेत गेलेल्या अनेकांच्या भवितव्यावर सध्या प्रश्नचिन्ह .
कोणावर होणार परिणाम?
- Prevailing Wage Determinations
- Permanent Labor Certification Applications असलेले
- H-2A, H-2B, CW-1 व्हिसा असलेले
- H-1B, H-1B1, आणि E-3 व्हिसा असलेले
मंजूर रेकॉर्ड कंट्रोल शेड्यूलची अंमलबजावणी गुरुवार, 20 मार्च 2025 पासून सुरू होईल. पात्र केस रेकॉर्ड हटवणे प्रत्येक केसच्या FLAG सिस्टीममध्ये नोंदवलेल्या final determination date वर आधारित असेल. म्हणजे जर 21 मार्च 2020 ही final determination date असलेलल्या केसेस 21 मार्च 2025 रोजी हटवल्या जातील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)